Home > News > दुध महागलं, अमुल ने २ रूपयांनी लीटरमागे दर वाढवले

दुध महागलं, अमुल ने २ रूपयांनी लीटरमागे दर वाढवले

अमूल दुधाच्या किमतीत (Amul Milk Price) वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वासामान्यांचा खिसा चांगलाच कापला जाणार आहे. अमूल दुधाच्या दरांमध्ये प्रति लीटर दोन रुपयांनी वाढ (Amul Milk Price Hike) करण्यात आली आहे. मंगळवारपासून १ मार्च पासून ही नवीन दरवाढ लागू झाली आहे.

दुध महागलं, अमुल ने २ रूपयांनी लीटरमागे दर वाढवले
X

दिवसेंदिवस देशातली महागाई वाढतच चालली आहे. त्याता आता देशवासीयांची सर्वात जास्त पसंती असलेल्या अमूल दुधाच्या किमतीत (Amul Milk Price) वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वासामान्यांचा खिसा चांगलाच कापला जाणार आहे. अमूल दुधाच्या दरांमध्ये प्रति लीटर दोन रुपयांनी वाढ (Amul Milk Price Hike) करण्यात आली आहे. मंगळवारपासून १ मार्च पासून ही नवीन दरवाढ लागू झाली आहे.

यापुढे ग्राहकांना अमूल गोल्ड अर्धा लिटर दुधासाठी ३० रुपये आणि अमूल ताजा अर्धा लिटर साठी २४ रुपये तर अमूल शक्ती अर्धा लिटर साथी २७ रुपये मोजावे लागणार आहेत. उत्पादनाचा खर्च वाढल्यामुळे ही दरवाढ करणं आवश्यक असल्याचं गुजरात सहकारी दूध वितरक संघाने सांगितलं आहे. दूध उत्पादनाच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे साधारण गेल्या ८ महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा दुधाची दरवाढ करण्यात आली आहे. अमूल दुधाच्या सर्वच ब्रँडसाठी ही दरवाढ लागू असणार आहे. यामध्ये अमूलच्या टी स्पेशल, सोना, ताजा, शक्ती याशिवाय गायी आणि म्हशीच्या दुधाच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे.

अमूलने या दरवाढीबाबत सांगितलं आहे की, दोन रुपये ही फक्त चार टक्क्यांची वाढ आहे. जी अन्नधान्याच्या सरासरी महागाईपेक्षा खूपच प्रमाणात कमी आहे. एनर्जी, पॅकेजिंग, ट्रान्सपोर्ट आणि जनावरांच्या चाऱ्याच्या सरासरी महागाईमुळे दूध उत्पादनाच्या खर्चामध्ये वाढ झाली आहे. एकूण खर्च वाढला असल्यामुळे अमूल दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

Updated : 1 March 2022 11:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top