Home > News > अच्छे दिन..? 10 महिन्यांत दुधाच्या दरात 12 रुपयांनी वाढ..

अच्छे दिन..? 10 महिन्यांत दुधाच्या दरात 12 रुपयांनी वाढ..

अच्छे दिन..? 10 महिन्यांत दुधाच्या दरात 12 रुपयांनी वाढ..
X

अमूलने दुधाच्या दरात लिटरमागे ३ रुपयांनी वाढ केली आहे. गुजरात डेअरी को-ऑपरेटिव्हने (AMUL) म्हटले आहे की, नवीन किमती तत्काळ लागू झाल्या आहेत. आता अमूल दुधाची ( milk price) किंमत गोल्ड 66 रुपये प्रति लिटर, अमूल फ्रेश 54 रुपये प्रति लिटर, अमूल गायीचे दूध 56 रुपये आणि अमूल ए2 म्हशीचे दूध 70 रुपये प्रति लिटर आहे. अमूलने या पूर्वी ऑक्टोबरमध्ये दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली होती.

अमूलने दूध महाग करण्याचे कारण काय?

दुधाच्या किमती वाढण्याबाबत अमूलने सांगितले की, "एकूण कामकाज आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे दुधाच्या किमतीत वाढ करण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पशुखाद्याचा खर्च सुमारे २०% वाढला आहे. निविष्ठा खर्चात वाढ झाल्यामुळे आमच्या सभासद संघटनेने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या दुधाच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत ८-९% ने वाढवल्या आहेत.

10 महिन्यांत दूध 12 रुपयांनी महागले..

गेल्या 10 महिन्यांत दुधाच्या दरात 12 रुपयांनी वाढ झाली आहे. याआधी सुमारे सात वर्षे दुधाचे भाव वाढले नव्हते. एप्रिल 2013 ते मे 2014 दरम्यान दुधाचे दर प्रतिलिटर 8 रुपयांनी वाढले होते. उन्हाळ्यात दुधाचे उत्पादन कमी होत असल्याने दूध कंपन्यांना पशुमालकांना जादा भाव द्यावा लागतो. त्यामुळे येत्या काळात दुधाचे दर वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

काँग्रेसने भाजपवर साधला निशाणा..

अमूलच्या दुधाच्या दरात वाढ झाल्यानंतर काँग्रेसने भाजपच्या 'अच्छे दिन' या नारेबाजीचा समाचार घेतला. काँग्रेसने ट्विट करून म्हटले आहे की, 'अमूलचे दूध ३ रुपयांनी महागले आहे. गेल्या वर्षभरात दरात आठ रुपयांनी वाढ झाली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये अमूल गोल्डची किंमत 58 रुपये प्रति लीटर होती, फेब्रुवारी 2023 मध्ये अमूल गोल्डची किंमत 66 रुपये प्रति लीटर झाली. अच्छे दिन?'

Updated : 4 Feb 2023 3:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top