Home > News > अमृता फडणविसांनी डिलीट केलेल्या त्या व्टिट चा असा होईल परिणाम

अमृता फडणविसांनी डिलीट केलेल्या त्या व्टिट चा असा होईल परिणाम

सतत चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस यांनी शनिवारी पुन्हा ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली. आणि भविष्यातील शिवसेना भाजप युतीची शक्यता पार धुळीस मिळाली. जाणून घेण्यासाठी वाचा हा रिपोर्ट!

अमृता फडणविसांनी डिलीट केलेल्या त्या व्टिट चा असा होईल परिणाम
X

युती तुटल्यापासून देवेंद्र फडणवीस यांनी जितकी टीका केली नसेल तितकी टीका अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर केली आहे. शनिवारी राणा दांपत्याच्या गोंधळानंतर रात्री अमृता फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांना उध्वस्त ठरकी म्हणत टीका केलीये.

२०१९ पासून भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आणि शिवसेनेने सत्तेत राहण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्तेचा संसार थाटला. यानंतर शिवसेनेवर ज्या ज्या पध्दतीने टीका करता येईल, हे सरकार पाडता येईल याचे सर्व प्रयत्न भाजप ने केले. भाजपने गेल्या अडीच वर्षात सरकार पाडण्याचे अनेक प्रयत्न केले आणि अजुनही सुरूच आहेत. आता तर राज ठाकरे यांना ही अप्रत्यक्षपणे आपल्या गोटात घेऊन सरकारवर टीका करण्यास भाग पाडल्याचे दिसत आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जितकी टीका सरकार आणि शिवसेनेवर केली नसेल तितकी टीका त्यांच्या पत्नी तसेच प्रसिध्द गायिका अमृता फडणवीस यांनी आतापर्यंत केली आहे.

पण शनिवारी त्यांनी ट्वीच करताना सर्वच मर्यादा ओलांडल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा मान न ठेवता मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर टीका केली. त्यांनी ट्विटमध्ये, " उध्वस्त ठरकीने कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र?....." असं म्हणत त्यानी #Maharashtra आणि #Maharashtraunderattack असे दोन हॅशटॅग्ज् वापरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर टीका केली आहे. अर्थात त्यांच्या या ट्विटला ज्या पध्दतीने प्रतिसाद मिळाला त्या नंतर त्यांच्या ट्विटवर चर्चाही सुरू झाल्या. त्या चर्चांमुळे अमृता फडणवीस यांना ते ट्वीट डिलीटही करावं लागलं.


पण इथे प्रश्न फक्त त्यांच्या ट्विटचा नाही आहे. प्रश्न हा शिवसेना आणि भाजप यांच्या भविष्यात होणाऱ्या युतीचा आहे. कारण येत्या काही काळात सरकार पडलं किंवा २०२४ ला महाविकास आघाडीमध्ये वितुष्ट आलं तर तेव्हाची राजकीय समीकरणं पाहता देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांनी एकत्र येण्याची शक्यता होती. पण अशा सर्व शक्यतांवर अमृता फडणवीस यांच्या या एका ट्विट ने पाणी ओतलं आहे. हे राजकारण आहे इथे काहीही होऊ शकतं. २०१९ पुर्वी असंभव वाटणारी महा विकास आघाडी देखील सत्तेसाठी उदयास आली. तर मग शिवसेना भाजप यांच्या एकत्र येण्याच्य़ा देखील तितक्याच शक्यता होत्या.

याचं मोठं उदाहरण म्हणजे २०१४ ला तुटलेली युती आणि सत्तेसाठी पुन्हा भाजपसोबत एकत्र आलेली शिवसेना आपण पाहिली होतीच की! खिशात राजीनामे घेऊन का होईना पण सत्तेची पाच वर्ष शिवसेनेने पुर्ण केलीच होती. पण अमृता फडणवीस यांच्या या ट्विटमुळे भाजप शिवसेना युतीची सारी कवाडं पुन्हा बंद झाली आहेत. पण पुन्हा एकदा हे राजकारण आहे इथे काहीही होऊ शकतं. सत्तेसाठी शिवसेना आपल्या पक्षप्रमुखाचा अपमान पचवू शकली तर भविष्यात भाजपसोबत आता अशक्य वाटणारी युती झाली तरीही आपल्याला नवल वाटायला नको.

Updated : 24 April 2022 6:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top