Home > News > अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं येतंय, हा सुप्रसिद्ध कलाकार असणारे सहगायक..

अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं येतंय, हा सुप्रसिद्ध कलाकार असणारे सहगायक..

अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं येतंय, हा सुप्रसिद्ध कलाकार असणारे सहगायक..
X

समाज माध्यमांवर अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. मग त्या राजकीय वक्तव्यांमुळे असेल किंवा त्यांच्या गाण्यामुळे. समाज माध्यमांवर त्यांना अनेक वेळा ट्रोल देखील केले जाते. मात्र त्यांना काडीचीही किंमत न देता आपली सर्व जबाबदारी सांभाळून त्या आपले छंद देखील मनमुरादपणे जोपासताना दिसतात. अमृता फडणवीस यांनी यापूर्वी देखील अनेक गाणी गायली आहेत. त्या नुकत्याच पार पडलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील सहभागी झाल्या होत्या. या फेस्टिवलमध्ये त्यांना पुरस्कारही प्राप्त झाला.

आता अमृता फडणवीस त्यांच्या चाहत्यांसाठी एक नवीन गाणं घेऊन येत आहेत. आगामी चित्रपट 'लव यू लोकतंत्र' साठी त्यांनी गाणं गायलं आहे. या गाण्यात प्रसिद्ध गायक शान हे त्यांचे सहगायक असनार आहेत. नुकतेच या गाण्याचं स्क्रिनिंग पार पडल्याचं अमृता फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटरवरुन सांगितला आहे. त्याचबरोबर चित्रपट आणि त्यांनी गायलेलं गाणं ऑगस्ट मध्ये प्रदर्शित होणार असल्याचेही अमृता फडणवीस यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Updated : 12 Jun 2022 5:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top