Home > News > ‘मॅडम चतुर, हीच तुमची औकात’, अमृता फडणवीस- प्रियंका चतुर्वेदींमध्ये शाब्दिक चकमक

‘मॅडम चतुर, हीच तुमची औकात’, अमृता फडणवीस- प्रियंका चतुर्वेदींमध्ये शाब्दिक चकमक

‘मॅडम चतुर, हीच तुमची औकात’, अमृता फडणवीस- प्रियंका चतुर्वेदींमध्ये शाब्दिक चकमक
X

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसऱ्या आठवड्याचा चौथा दिवस आहे. यावेळी विधानसभेत अमृता फडणवीस यांनी एका डिझायनरविरोधात दाखल केलेल्या तक्रारीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devndra Fadnavis) यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना एक कोटींची लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला. अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या डिझायनर अनिक्षाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी एक ट्वीट शेअर केले. प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी ट्वीट शेअर केल्यानंतर अमृता फडणवीस यांनी देखील एक ट्वीट शेअर केलं. त्यानंतर प्रियांका चतुर्वेदी आणि अमृता फडणवीस यांच्यामध्ये ट्विटर वॉर सुरु झाला. दोघींच्या ट्वीटनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा वाद आता पेटला असून ठाकरे गटाच्या खासदार

प्रियंका चतुर्वेदी यांचं ट्विट रिट्विट करत थेट त्यांची औकातच काढली. यात पश्चिम बंगाल च्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुओ मोईत्रा ( mp mahua moitra ) यांची एंट्री झाली आहे.

अमृता फडणवीस यांनी प्रियंका चतुर्वेदी यांचं ट्विट करत ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर

जोरदार टीका केली. अमृता फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, मॅडम चतुर आधी तुम्ही खोटा दावा केला होता की मी AxisBank ला फायदा करून दिला.

आता तुम्ही माझ्या प्रामाणिकपणाला आव्हान देत आहात? अर्थात तुमचा विश्वास संपादन केल्यानंतर, जर कोणी

तुमच्याकडे पैसे देऊन केसेस बंद करण्यासाठी संपर्क साधला असता तर तुम्ही अशा व्यक्तीला तुमच्या मालकाकडून

मदत केली असती. तीच तुमची औक़ात आहे.

यावर महुआ मोईत्रा यांनी ट्विट करत म्हटलं की, मी प्रियांकाशी सहमत आहे. काही स्त्रिया "औकत" सारख्या कमी बजेटच्या

हिंदी चित्रपटातील डायलॉग वापरतात हे आश्चर्यकारक आहे!! मला असं म्हणायचे की हे वास्तविक जीवनातही असे शब्द वापरतात. औकात शब्द वापरणे म्हणजे वेडगळपणाच, असा खोचक टोलाही मोईत्रा यांनी अमृता फडणवीस यांना लगावला..

Updated : 18 March 2023 2:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top