Home > News > अमृता फडणवीस यांनी उद्धाव ठाकरेंना 'भोगी' म्हटल्यानंतर नेटकर्यांनी फडणवीसांनी 'पातेलं' म्हंटल…कॉमेंट बॉक्समध्ये रंगला शाब्दिक वाद

अमृता फडणवीस यांनी उद्धाव ठाकरेंना 'भोगी' म्हटल्यानंतर नेटकर्यांनी फडणवीसांनी 'पातेलं' म्हंटल…कॉमेंट बॉक्समध्ये रंगला शाब्दिक वाद

ऐ ‘भोगी’ , कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से ! असं म्हणत अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. पण त्यांच्या या ट्विटनंतर अमृता फडणवीस यांच्या कॉमेंट बॉक्समध्ये नेटकऱ्यांचा चांगलाच शाब्दिक वाद रंगला आहे.

अमृता फडणवीस यांनी उद्धाव ठाकरेंना भोगी म्हटल्यानंतर नेटकर्यांनी फडणवीसांनी पातेलं म्हंटल…कॉमेंट बॉक्समध्ये रंगला शाब्दिक वाद
X

" मनसेच्या औरगांबादमधील सभेच्या मंजूरीची प्रक्रीया अंतिम टप्पयात असताना राज्याच्या राजकारणामध्ये मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. उत्तर प्रदेशमध्ये ११ हजारांहून अधिक धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आलेत तर ३५ हजारांहून अधिक ठिकाणी भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचं निश्चित करण्यात आल्याच्या बातमी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असणाऱ्या योगी आदित्यनाथ सरकारवर कौतुकाचा वर्षाव केलाय. राज ठाकरे पाठोपाठ आता अमृता फडणवीस यांनी देखील ऐ 'भोगी', कुछ तो सीख हमारे 'योगी' से! असं म्हणत ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

राज्याच्या राजकारणामध्ये मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये ११ हजारांहून अधिक धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आलेत तर ३५ हजारांहून अधिक ठिकाणी भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचं निश्चित करण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असणाऱ्या योगी आदित्यनाथ सरकारवर कौतुकाचा वर्षाव केलाय. मात्र त्याच वेळी त्यांनी महाराष्ट्रामध्ये सत्तेत असणाऱ्या ठाकरे सरकारवर टिका केलीय.

योगी सरकारच्या या निर्णयावर सोशल मीडियावरुन व्यक्त होताना राज यांनी एक पोस्ट केलीय. यामध्ये राज यांनी, "उत्तर प्रदेशमधील धार्मिक स्थलांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार," असं म्हटलंय. पुढे बोलताना राज यांनी, ठाकरे सरकावर निशाणा साधलाय. "आमच्याकडे महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी'!", असं म्हटलंय. तर पोस्टच्या शेवटच्या ओळीत राज यांनी, "महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना," असंही म्हटलं आहे.

अमृता फडणवीस यांनी अशा प्रकारचे ट्विट केल्यानंतर त्यांच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्या प्रतिक्रिया काय आहेत ते देखील पाहुयात..

ओमीबाबा या ट्विटर वापरकर्त्याने देवेंद्र फडणवीस यांचा काहीतरी खात असतानाच एक फोटो शेअर केला आहे. या फोटो मध्ये देवेंद्र फडणवीस कोचवर बसून खात आहेत. त्यांच्या समोर असलेल्या टेबलवर वेगवेगळे पदार्थ ठेवले आहेत आणि त्यांनी या फोटोला "ऐ भोगी..." असं कॅप्शन दिले आहे.

नितीन गवळी या ट्विटर वापरकर्त्याने अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्विटला उत्तर दिले आहे. ते आपल्या उत्तरात म्हणतात की, काय शिकावे.... राज्यात खून बलात्कार... जातीवाद... मारणे ....मारून टाकने.... घर पाडणे.... नियम पायदळी तुडवने.... दंगल घडवणे... हुकुमशाही... देशांतील सर्व सरकारी कंपन्या विकणे... खाजगी करणे...आपल्याच राज्याचा विकास करणे...निवडणूक आली की मेरा बहोत पुराना नाता है हे शिकावे काय

अभिषेक पवार ट्विटर वापरकर्ते म्हणतात की अमृता फडणवीस जी तुम्ही "भोगी" बद्दल सांगूंच नका, तुम्ही #अलिबाग काय काय #भोगलय हे सर्वांनाच माहीत आहे...!!

डॉ. दत्ता मोरे यांनी अमृता फडणवीस यांच्या ट्विटला उत्तर देताना म्हटले आहे की, तुम्हारा पस्तीस पुरणपोळी खानेवाला पातेला किधर हैI जय अभ्यासू

अशा प्रकारच्या अनेक कमेंट्स तुम्हाला अमृता फडणीस यांच्या ट्विटखाली पाहायला मिळतील.

उत्तर प्रदेशमधील ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले आहेत. तर ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे. मागील चार दिवसांमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी दिली. राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत भोंग्यांच्या आवाजासंदर्भात तातडीने कारवाई करण्यासंदर्भातील निर्देश जिल्हास्तरीय प्रशासनाला दिल्यानंतर राज्यात भोंग्याविरोधातील मोहीम सुरु करण्यात आलीय.

Updated : 29 April 2022 1:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top