Latest News
Home > News > "धन्यवाद, मी तुमचा सल्ला....", शेखर पासेकरांच्या पत्राला अमृता फडणवीसांचे उत्तर !

"धन्यवाद, मी तुमचा सल्ला....", शेखर पासेकरांच्या पत्राला अमृता फडणवीसांचे उत्तर !

धन्यवाद, मी तुमचा सल्ला...., शेखर पासेकरांच्या पत्राला अमृता फडणवीसांचे उत्तर !
X

अमृता फडणवीस यांचा ड्रग पेडलर सोबतचा फोटो नवाब मलिकांनी सोशल मिडीयावर पोस्ट केला होता. यावर पत्रकार परीषद घेऊन अमृता फडणवीस यांनी नवाब मलिकांवर टीका केली होती. टीका करताना त्यांची जीभ घसरली होती. त्यांच्या या वक्तव्यावर शेखर पासेकर यांनी एक पत्रच अमृता फडणवीस यांच्य़ासाठी लिहिले होते. या पत्रात त्यांनी वडीलकीच्या नात्याने सल्ला दिला होता.

त्यांच्या या पत्राला आता अमृता फडणवीसांनी उत्तर दिलं आहे. अमृता फडणवीस यांनी देखील हा सल्ला ऐकायचं ठरवलं आहे. त्यांनी शेखर पासेकर यांच्या या पत्रावर प्रतिक्रीया दिली आहे. प्रतिक्रीया देताना त्यांनी " धन्यवाद, मी तुमचा सल्ला लक्षात ठेवीन!" असं म्हटलं आहे.

Updated : 4 Nov 2021 8:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top