Home > News > देवेंद्र फडणवीसांच्या वजनावरून केलेल्या टीकेला अमृता फडणीस यांचे उत्तर

देवेंद्र फडणवीसांच्या वजनावरून केलेल्या टीकेला अमृता फडणीस यांचे उत्तर

देवेंद्र फडणवीसांच्या वजनावरून केलेल्या टीकेला अमृता फडणीस यांचे उत्तर
X

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुंबईत झालेल्या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वजनावरून खिल्ली उडवली. उद्धव ठाकरे म्हणाले होते की, "बाबरी पडली तेव्हा मी अयोध्येत होतो. पण तेव्हा देवेंद्र फडणवीस बाबरी मशिदीवर नुसते चढले जरी असते तरी त्यांच्या वजनाने बाबरी खाली कोसळली असती. कारसेवकांना बाबरी पाडण्यासाठी इतके कष्ट करावेच लागलेच नसते."

आता उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर अमृता फडणवीस यांनी त्यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी एक ट्विट केला आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हंटल आहे की, "वज़नदार ने हल्के को,बस हल्के से ही वज़न से, कल 'हल्का' कर दिया ... " अमृता फडणवीस यांच्या या ट्विटनंतर आता पुन्हा शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलच वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले होते उध्दव ठाकरे..


शिवसंपर्क अभियानांतर्गत असलेल्या सभेला संबोधित करताना उध्दव ठाकरे म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी पाडायला गेल्याचा दावा केला होता. पण ती काय शाळेची सहल होती का? तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, जर देवेंद्र फडणवीस यांनी पाय जरी ठेवला असता तरी बाबरीचा ढाचा कोसळला असता, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांच्या वजनावरून उध्दव ठाकरे यांनी टीका केली होती.

Updated : 16 May 2022 7:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top