Home > News > अमृता फडणवीस ट्रोल; मदर्स डे च्या पोस्टवर सुद्धा नेटकरी स्वतःला आवरू शकले नाहीत..

अमृता फडणवीस ट्रोल; मदर्स डे च्या पोस्टवर सुद्धा नेटकरी स्वतःला आवरू शकले नाहीत..

अमृता फडणवीस ट्रोल;  मदर्स डे च्या पोस्टवर सुद्धा नेटकरी स्वतःला आवरू शकले नाहीत..
X

काल जगभरात मातृदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मातृदिवसाच्या निमित्ताने समाज माध्यमांवर अनेकांनी आपल्या आईसोबतचे फोटो शेअर केल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये अगदी सर्वसामान्य लोकांपासून राजकीय नेते असतील किंवा सिनेसृष्टीतील कलाकारांनी सुद्धा समाज माध्यमांवर आपल्या आई विषयी व्यक्त होत फोटो शेअर केले आहेत. याचप्रमाणे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुद्धा त्यांच्या मुलींसोबत एक फोटो शेअर केला आहे.

अमृता फडणवीस व त्यांच्या मुलीने हातात रंगेबिराबगी पोपट घेऊन घेऊन हा फोटो काढलेला आहे. व त्यांनी हाच फोटो समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी कॅपशन देत म्हंटले आहे की, "प्रत्येक आईकडून प्रत्येक मुलीला प्रत्येक नवीन दिवसासोबत करुणा वाटू दे.....सुपर मॉम्स आणि भाग्यवान वडिलांना #मदर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा"

अमृता फडणवीस या नेहमीच त्यांच्या वक्तव्यावरुन चर्चेत असतात. त्यांनी केलेलं प्रत्येक ट्विट हे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतं. मात्र त्यांचं कालचं हे ट्विट कुठलीही राजकीय भूमिका मांडणारे नव्हतं. त्यांनी मदर्स डे निमित्त केलेले हे ट्विट होतं. मात्र या ट्विटवर देखील नेटकरी टीका करण्यापासून स्वतःला आवरू शकले नाहीत. अमृता फडणवीस यांच्या या फोटोवरून देखील त्यांना ट्रोल केलं जात आहे. त्यांच्या या ट्विटवर काय कॉमेंट्स आल्या आहेत पाहुयात..

तर कौस्तुभ या एका ट्विटर वापरकर्त्याने अमृता फडणवीस यांना उत्तर देत म्हटले आहे की, #Ban_Plastic

@AUThackeray कृपा करून प्लास्टिक वर सक्त बंदी आणा... बंदी असूनही अजूनही प्लॅस्टिकचा सर्रास वापर होत आहे ..गैर वापर च म्हणा... 🤣😅 प्लास्टिक वर पूर्णतः बंदी आणा...जे वापरले आहे ते पण काढून घ्या प्लास्टिक 🤣🤣

दीप या ट्विटर वापरकर्त्याने अमृता फडणवीस यांना रिट्विट करत म्हटले आहे की, "घरी एक असताना दोन घेतले"

मकदूमी पांडे यांनी म्हंटल आहे की, आज शिव्या न खाण्यासारखे ट्विट केले आहे बरं वाटलं..

JAMMY यांनी ट्विट करता म्हंटल आहे की, अरे व्वा,

सी,बी,आय.अन यीडी दोन्ही पण नाचवले अन खेळवले जातायत ......….त्यांच्यापुढे गाणं तेवढं म्हणू नका, पेटा वाले नोटीस पाठवतील

Mak हा ट्विटर वापरकर्त्याने म्हटला आहे की, आज कुणीच भाजपवाल्याने गाईचा फोटो ठेऊन "हॅप्पी मदर्स डे" च्या पोस्ट केल्यात नाही. याचाच अर्थ हा की गाय खरी आई नाही तर राजकारणाचा मुद्दा आहे. 🙏🏻

वैभव शिंगणापूरे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मॅडमनी टोटल तीन पोपट पाळले आहेत..

ऋषिकेश पाटील यांनी म्हंटल आहे की, काय हो मामी तुम्ही पण... मामुचा एवढा पोपट झाला तरी तुम्हाला काहीच नाही, अजून दुसरे पोपट?

अशा प्रकारच्या अनेक कमेंट्स अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्विटवर आल्या आहेत. खरंतर अमृता फडणवीस यांनी समाज माध्यमांवर कोणतीही गोष्ट व्यक्त केली की त्यावर नेटकरी तुटून पडतात. काल त्यांनी मदर्सडे निमित्त पोस्ट केली आणि त्यावर ती देखील नेटकरी तुटून पडले. तर त्यांनी केलेल्या अशा अराजकीय किंवा वैयक्तिक पोस्टवर त्यांना ट्रोल करणं कितपत योग्य आहे हे आता तुम्ही ठरवा..

Updated : 9 May 2022 6:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top