Home > News > पुण्यातील ड्रंक आणि ड्राइव्ह प्रकरणाविषयी अमृता फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया

पुण्यातील ड्रंक आणि ड्राइव्ह प्रकरणाविषयी अमृता फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया

पुण्यात पोर्श या महागड्या गाडीखाली दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अल्पवयीन चालक परवाना नसताना बेजबाबदारपणे गाडी चालवत होता. यावर अमृता फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.

पुण्यातील ड्रंक आणि ड्राइव्ह प्रकरणाविषयी अमृता फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया
X

जवळपास १५० किमी वेगाने या गाडीने दुचाकीला उडवले. या दुचाकीवर एक जोडप होतं या जोडप्यापैकी तरुणीचा जागीच मृत्यु झाला. तर, तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यु झाला. तर याप्रकरणावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी " अमृता फडणवीस " यांनी संताप व्यक्त केला आहे.यांनी याबाबत एक्सवरून पोस्ट केली आहे.

१९ मेच्या पहाटे अडिजच्या सुमारास पुण्याच्या कल्याणीनगर या ठिकाणी नंबरप्लेट नसलेल्या पोर्श कारने एका मोटारसायकलला जोरदार धडक दिली होती. तर या आपघातात दोन दुचाकीस्वरांचा मृत्यु झाला होता. या अपघातानंतर पोलिसांनी आरोपिला ताब्यात घेतले. त्यानंतर रविवारी दुपारी त्याला विशेष हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आलं. तसेच पोलिसांनी त्याची रवानगी कोठडीत करण्यात यावी अशी मागणी केली. आरोपी साडेसतरा वर्षांचा आहे, त्यामुळे त्याला पौढ समजून खटला चालवला जावा, अशी मागणीही करण्यात आली. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. तसेच या आरोपीला जामीन मंजूर केला. ३०० शब्दांचा निबंध लिहून देणे, आरटीओला सहकार्य करणं, तसेच आपघात ग्रस्तांना मदत करणे इत्यादी अटींवरून त्याला जामीन मंजुर करण्यात आल्यामुळे महाराष्ट्रभर याचा संताप व्यक्त करण्यात आला.

एखाद्या आपघातात दोघांचा मृत्यु झाला आणि त्याला जामिनावर सोडण्याकरीता फक्त निबंध लिहिण्याची शिक्षा देणं म्हणजे कायद्याचा आपमान असल्याचा सूर

सर्वसामान्यांतून उमटू लागला. तर आता यावर अमृता फडणवीस देखील व्यक्त झाल्या आहेत. " अनिश अवाधिया आणि आश्विनी कोस्टा यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. तसेच आरोपी वेदांत अग्रवालला कठोर शिक्षा जाली पाहिजे. बालन्याय मंडळाचा निषेध". अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

Updated : 22 May 2024 12:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top