Home > News > तरुणांची माथी उगाच भडकवू नका - आकांक्षा ठाकूर यांचा अनिल बोंडेंना सल्ला

तरुणांची माथी उगाच भडकवू नका - आकांक्षा ठाकूर यांचा अनिल बोंडेंना सल्ला

तरुणांची माथी उगाच भडकवू नका - आकांक्षा ठाकूर यांचा अनिल बोंडेंना सल्ला
X

देशभरात गेल्या काही काळापासून धार्मिक द्वेष वाढतानाच दिसतोय. राजस्थान आता दिल्ली इथं धार्मिक दंगली झाल्यानंतर अमरावतीमध्ये देखील असाच काहीसा प्रकार होण्याची चिन्ह दिसत आहेत. अमरावतीच्या अचलपूरमध्ये फक्त झेंड्याच्या रंगावरून वातावरण अतिशय तापलं आहे. दोन दिवसांपूर्वी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तसेच अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीकराना शांततेचं आवाहन केलं. तर या प्रकरणी भाजप नेते अनिल बोंडे यांच्यावर तरुणांची माथी भडकवल्याप्रकरणी चहुबाजूंनी टीका होऊ लागलीये.।

अमरावती जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमरावतीतील सुजाण नवतरुणांना बिघडवण्याचा प्रयत्न करू नका, आम्हाला भारताला सुपर पॉवर झालेले बघायचे आहे, असे आवाहन तिवसा विधानसभा मतदारसंघ युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा आकांक्षा ठाकूर यांनी केले आहे.

भाजपचे माजी आमदार अनिल बोंडे यांनी स्वतःच्या मुलांना परदेशात पाठवून इथल्या तरुणांची माथी भडकवण्याचे काम करू नये. आम्हाला येथे शांतता आणि प्रगती हवी आहे. आम्हाला भारताला सुपर पॉवर झालेले बघायचे आहे आणि भारताचा हॅपिनेस इंडेक्स वाढलेला बघायचे आहे. आम्हाला शांततेत जगू द्या आणि अमरावतीच्या आणि राज्याच्या विकासाला हातभार लागू द्या असे आवाहन ठाकूर यांनी केले आहे.

Updated : 20 April 2022 1:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top