Home > News > खासदार नवनीत राणा उपचारासाठी तातडीने मुंबईला रवाना, लीलावतीत उपचार सुरु

खासदार नवनीत राणा उपचारासाठी तातडीने मुंबईला रवाना, लीलावतीत उपचार सुरु

खासदार नवनीत राणा उपचारासाठी तातडीने मुंबईला रवाना, लीलावतीत उपचार सुरु
X

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची प्रकृती आणखीच बिघडल्याची माहिती समोर येते आहे. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ नागपूरवरून मुंबईला उपचारासाठी रवाना करण्यात आलं आहे. काही दिवसांपुर्वी खासदार नवनीत राणा यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 12 जणांना कोरोनाची लागण झाली होती.

नवनीत राणा यांनां श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे आणि त्यांच्या फुफ्फुसांवर परिणाम झाल्यामुळे वोकहार्ट रुग्णालयाच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना तात्काळ मुंबई नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवनीत राणा यांना रस्तेमार्गे रुग्णवाहिकेतून मुंबईला आणलं जात आहे.

आपल्या प्रकृतीची चिंता न करता आमदार रवी राणा हे देखील नवनीत राणा यांच्यासोबत रुग्णवाहिकेत आहेत. मुंबईत लीलवाती रुग्णालयात डॉ. जलील पारकरच्या मार्गदर्शनाखाली नवनीत राणा यांच्यावर उपचार होणार आहेत.

दरम्यान, खासदार नवनीत कौर राणा आणि आमदार रवी राणा यांच्यासह राणा कुटुंबातील 12 जणांना कोरोनाची लागण झाली. नवनीत राणा यांची चार वर्षाची मुलगी, मुलगा, सासरे, सासू, नणंद, नणंदेचा नवरा आणि इतर अशा 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आई-वडिलांना कोरोनाची लागण झाल्याने रवी राणा हे त्यांना नागपूरला उपचारासाठी घेऊन गेले होते. तर त्यांच्या मुलांवर अमरावतीत उपचार सुरू असून नवनीत राणा या त्यांची देखभाल करत आहेत. मुलांची देखभाल करत असतानाच त्यांनाही ताप आणि खोकला येऊ लागला. कोरोना सदृश्य लक्षणे जाणवल्याने नवनीत यांनी कोरोनाची टेस्ट केली असता त्यांना लागण झाल्याचे आढळून आले. तर, दुसरीकडे आई-वडिलांसोबत नागपूरमध्ये असलेले आमदार रवी राणा यांनाही त्रास जाणवू लागल्याने त्यांनीही कोरोनाची चाचणी केली. त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

https://youtu.be/0jIua4sHgOc

Updated : 13 Aug 2020 10:42 PM GMT
Next Story
Share it
Top