Home > News > अमोलची अनमोल कहाणी ,बर्फाखाली झाला शहीद ,वाचवले दोघा जवानांचे प्राण ...

अमोलची अनमोल कहाणी ,बर्फाखाली झाला शहीद ,वाचवले दोघा जवानांचे प्राण ...

अमोलची अनमोल कहाणी ,बर्फाखाली झाला शहीद ,वाचवले दोघा जवानांचे प्राण ...
X

अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवर बचाव कार्याचे नेतृत्व करताना वाशिम(washim) जिल्ह्यातील सोनखास येथील भारतीय लष्कराचे पॅराकमांडो अमोल गोरे (Amol gore )शहीद झाले.

शहीद अमोल गोरे हे लष्करात पॅराकमांडो म्हणून देशाची सेवा करत होते. देशसेवा करताना त्यांनी यापूर्वीही अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये भाग घेतला होता.सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान वाशिम जिल्ह्यातील सोनखास या त्यांच्या गावी पूर्ण शासकीय स्वरुपात अंत्यसंस्कार करण्यात आले .

25 एप्रिल रोजी ते रजेवर घरी परतणार होते. मात्र त्याआधीच ही दुख:दायक घटना घडली. अमोल यांना पत्नी, आई-वडील, भाऊ आणि बहीण तसेच एक 4 वर्षांचा मुलगा आहे. अमोल सारख्या शूर आणि मनमिळावू सैनिका बद्दल वाशिम परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

14 एप्रिल रोजी पहाटे 4 वाजता त्याचे दोन सैनिक एका टेकडीवरून खाली घसरले आणि बर्फात गाडले गेले, तेव्हा सोनखास गावचे रहिवासी अमोल गोरे भारत-चीन सीमेवर अरुणाचल प्रदेशातील युनिट 11 SF परसैनिकासह गस्तीवर होते. पहाटे चार वाजता अमोल गोरे यांनी दोन जवानांना वाचवण्यासाठी बर्फात झेप घेतली. ते दोघेही बचावले. मात्र, यामध्ये वाशिम जिल्ह्यातील अमोल गोरे यांचा मृत्यू झाला.

Updated : 19 April 2023 11:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top