Home > News > 'नाराज' पंकजा मुंडेंना थेट अमित शहांचा फोन आणि...

'नाराज' पंकजा मुंडेंना थेट अमित शहांचा फोन आणि...

नाराज पंकजा मुंडेंना थेट अमित शहांचा फोन आणि...
X

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रितम मुंडे (Pritam Munde) यांना संधी मिळाली नाही म्हणून, भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे. त्यातच बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसासाठी लावण्यात आलेल्या होर्डिंगवर भाजपच्या राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचे फोटो नसल्याने विविध चर्चांना उधाण आले होते. पण नाराजीची चर्चा सुरु असतानाच पंकजा मुंडेंना थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोन आला असून, याची माहिती खुद्द पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

झालं असं की, पंकजा मुंडे यांचा 26 जुलै रोजी वाढदिवस होता. यासाठी अमित शहा यांनी पंकजा मुंडे यांना फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन या बाबतची माहिती दिली आहे.

पंकजा मुंडे नाराज असल्याच्या अनेक चर्चा सद्या सुरु आहेत. मात्र त्यांनी यापूर्वीच दोनदा पत्रकार परिषद घेऊन आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच मुंबईत समर्थकांची बैठक घेऊन आपण नाराज नसून पूर्ण ताकदीने पक्षाचे काम करण्याचे आवाहन देखील केले होते.

Updated : 27 July 2021 12:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top