Home > News > कोर्टाप्रती असलेला विश्वास संपला... अखेर कंगना कोर्टात हजर

कोर्टाप्रती असलेला विश्वास संपला... अखेर कंगना कोर्टात हजर

कोर्टाप्रती असलेला विश्वास संपला... अखेर कंगना कोर्टात हजर
X

गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुसानीच्या फौजदारी खटल्यातवादग्रस्त अभिनेत्री कंगना राणौतने हजेरीवरुन जोरदार संताप व्यक्त अटक वॉरंट काढण्याचा इशारा दिल्यानंतर कंगनाने आज कोर्टात हजेरी लावत कोर्टाप्रती विश्वास संपला असून दुसऱ्या कोर्टापुढे सुनावणी करावी अशी मागणी केली आहे.

गतवर्षी कोविड काळात वादग्रस्त विधानं केल्यानं कंगना चर्चेत आली होती. अनेक ठिकाणी तिच्या विरोधात खटले सुरु आहेत. नुकतीच जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या फौजदारी तक्रारीची दखल घेत अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी सुरू केलेली कारवाई रद्द करण्याची अभिनेत्री कंगनाची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली होती. कारवाई सुरू करण्याचा महानगरदंडाधिकाऱ्यांचा आदेश बेकायदा नाही, त्यात अनियमितता नाही. त्यामुळे त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला होता.

यापुर्वी वारंवार सुनावणीसाठी हजर होणं टाळलेल्या कंगनानाने मागील वेळी कोरोनाचा आधार घेतला. कंगनाला करोनाची लक्षणं आढळली असून कोविड चाचणी झाली आहे. रिपोर्ट अजून आलेला नाही अशी माहिती तिचे वकील रिझवान सिद्दिकी यांनी दिले होते. कोर्टानं आता उपस्थित राहीला नाही तर अटक वॉरंट काढू असा इशारा दिला होता. अखेर कंगनाने आज कोर्टात उपस्थिती लावली. कंगनाने आता जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल करत गुन्हेगारी वृत्ती आणि खंडणीचा आरोप केला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी १५ नोव्हेंबरला होणार आहे.

Updated : 20 Sep 2021 9:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top