Home > News > अंबानींच्या घरी पाळणा हलला, हे पोरगं नक्की सांगेल 'मी अंबानींचा नातू आहे'

अंबानींच्या घरी पाळणा हलला, हे पोरगं नक्की सांगेल 'मी अंबानींचा नातू आहे'

अंबानींच्या घरी पाळणा हलला, हे पोरगं नक्की सांगेल मी अंबानींचा नातू आहे
X

मुकेश अंबानींच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. मुकेश अंबानी आजोबा आणि नीता अंबानी आजी झाल्या आहेत. त्यांची सून श्वोकाने गुरुवारी सकाळी 11 वाजता एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यामुळे अंबानी कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. एकीकडे कोरोना काळात मुकेश अंबानी यांनी जियो प्लॅटफॉर्म्सवर बक्कळ पैसा कमावला. दुसरीकडे, त्यांच्या नातवाचा जम्न झाला, त्यामुळे मुकेश अंबानींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

आकाश अंबानी-श्लोका मेहता यांना मुलगा झाला असून अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अॅंटिलियावर पहिल्यांदाच पाळणा हलला आहे. या बाळाच्या रूपाने अंबानी यांची चौथी पिढी सुरु होणार झाली आहे.

आकाश अंबानी आणि श्लोका २०१९ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. आकाश आणि श्लोका दोघेही शाळेपासूनच एकमेकांना ओळखत आहेत. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्येच दोघांनीही आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. आकाश आणि श्लोका यांच्या लग्न अत्यंत थाटामाटात पार पडलं होतं. जगभरात या लग्नाची चर्चा होती. सोशल मीडियावरही कित्येक दिवस त्यांच्या शाही विवाहसोहळ्याची चर्चा सुरु होती. या लग्नाला सिनेसृष्टीपासून, क्रिडा जगतामधील बड्या नावांबरोबरच उद्योग श्रेत्रातील दिग्गजांचाही समावेश होता.

Updated : 10 Dec 2020 11:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top