Home > News > कोरोना लसीचा मुद्दा विठ्ठलाच्या दरबारात

कोरोना लसीचा मुद्दा विठ्ठलाच्या दरबारात

कोरोना लसीचा मुद्दा विठ्ठलाच्या दरबारात
X

कोरोनावरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीविठ्ठलाच्या चरणी घातले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशी निमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी मानाचे वारकरी कवडुजी भोयर, कुसुमबाई भोयर हे ठरले.

अवघ्या जगासमोर कोरोनाचे आव्हान आहे. आपण या आव्हानाला सक्षमपणे तोंड देत आहोत. पण गेला काही काळ कोरोना आटोक्यात आला, असे चित्र होते. मात्र गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रूग्ण परत वाढत आहेत. त्यामुळे आपण सर्वांनाच काही बंधने पाळणे गरजेचे आहे, असे अजित पवार म्याहणाले. तसंच बाबतीत समस्त वारकरी बांधवांनी शासनाच्या आवाहनाला आषाढी यात्रेप्रमाणे कार्तिक यात्रेतही प्रतिसाद दिला, याबद्दल त्या़ंनी आभार मानले.

राज्यातील शेतकरी यंदाच्या वर्षी अतिवृष्टिने संकटात आला आहे. या शेतकऱ्यांच्या जीवनातील दुख: हलके करण्याची ताकद शासनाला दे, अशी प्रार्थना त्यांनी विठ्ठलाकडे केली. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करुन त्यांनी दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना वंदन केले. याचबरोबर त्यांनी आज असणाऱ्या संविधान दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

Updated : 26 Nov 2020 4:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top