Home > News > कोरोनातून बऱ्या झालेल्या अजितदादांना सुप्रिया सुळे यांचे दोन सवाल

कोरोनातून बऱ्या झालेल्या अजितदादांना सुप्रिया सुळे यांचे दोन सवाल

“दादा तू आता जास्त वेळ काम करत बसणार नाहीय ना?” असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी कोरोनानंतर पुन्हा सक्रिय झालेल्या अजित पवार यांना विचारला आहे.

कोरोनातून बऱ्या झालेल्या अजितदादांना सुप्रिया सुळे यांचे दोन सवाल
X

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनावर मात करून पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. मंत्रालयातील आपल्या उपमुख्यमंत्री दालनात आज अजित पवार आले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट मंत्रालयातून फेसबूक लाईव्ह केलं आहे. यावेळी या बहिण भावांतील प्रेम पुन्हा एकदा समोर आलं.

खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या प्रकृतीची चौकशी केली. सुप्रिया सुळे यांनी "दादा तू आता जास्त वेळ काम करत बसणार नाहीय ना? डॉक्टरांनी तुला काम करायला सांगितलंय का?" असे प्रश्न विचारत त्यांची चौकशी केली. यावर अजित पवार म्हणाले की, 'आज मंत्रालयात काम करणार आहे. त्यानंतर बारामतीला जाईल.'

दरम्यान, अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अखेर आठ दिवस घरीच विश्रांती घेतल्यानंतर अजितदादा पुन्हा एकदा कामाला लागले आहेत.

Updated : 10 Nov 2020 1:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top