Home > News > एअर इंडियाच्या महिला वैमानिक इतिहास घडवणार...

एअर इंडियाच्या महिला वैमानिक इतिहास घडवणार...

एअर इंडियाच्या महिला वैमानिक इतिहास घडवणार...
X

भारतीय हवाई वाहतूकीच्या दृष्टीकोनातून एअर इंडिया ९ जानेवारी २०२० ला एक नवा इतिहास रचणार आहे. एअर इंडियाच्या महिला वैमानिक नोर्थ पोल, सॅन फ्रान्सिस्को ते बंगळूरू हे १६००० किमीचं जगातलं सर्वात मोठं अंतर कापणार आहे. एअर इंडियाच्या ए.आय.कॅप्टन जोया अग्रवाल या विमानाचं सारथ्य करणार आहेत. तर त्यांची संपूर्ण महिला वैमानिकांची टिम त्यांना साथ देणार आहे.

जगातील कुठल्याही देशातील, कुठल्याही विमान वाहतूक करणाऱ्या कंपनीच्या महिला वैमानिकांनी इतके मोठे अंतर पूर्ण केले नाही. जोया अग्रवाल आणि त्यांचा महिला वैमानिकांची टिम ही १६००० किमी इतकं मोठं अंतर कापणाऱ्या पहिल्या महिला वैमानिकल ठरणार आहेत. या आधी जोया अग्रवाल या २०१३ साली बोइंग-७७७ हे चालवणाऱ्या सर्वात तरूण महिला वैमानिक ठरल्या होत्या.

एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांना या बद्दल विचारल्यानंतर त्यांनी "नोर्थ पोलकडे विमान प्रवास करणं खूप आव्हानात्मक आहे. त्यामुळे विमान वाहतूक करणाऱ्या कंपन्या त्यांच्या सर्वोत्तम वैमानिकांना या विमान प्रवासाचं सारथ्य देता. या वेळी एअर इंडियाने पोलार रूट द्वारे सॅन फ्रान्सिस्को ते बंगळूरू या विमान प्रवासाची जबाबदारी एका महिला वैमानिकेला दिली आहे.

"जगातील बहुतेक लोकांनी अजून नॉर्थ पोल बद्दल ऐकलंही नसेल, किंवा त्यांनी नकाशावर पाहिलं देखील नसेल. एअर इंडियाने आणि नागरी विमान मंत्रालयाने मला दिलेल्या या विषेश अधिकाराबद्दल खूप आनंद होत आहे. तसेच हा माझ्या वैमानिकाच्या करिअरसाठी मानाचा भाग आहे. तसेच बोइंग-७७७, सॅन फ्रान्सिस्को ते बंगळूरू या जगातील सर्वात मोठ्या विमान वाहतूकीचं सारथ्य करायला मला मिळालं हे माझ्यासाठी भाग्याचं आहे. त्याचबरोबर या विमान प्रवासावर जाण्यासाठी माझ्यासोबत एअर इंडियाच्या कॅप्टन थन्मय पापागरी, आकांक्षा सोनावणे आणि शिवानी मनहास या अनुभवी महिला वैमानिकांची टिम असणार आहे. याचा मला अभिमान आहे. त्याचबरोबर अशा प्रकारची संधी मिळणं हे कोणत्याही वैमानिकाला त्याचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे."

- जोया अग्रवाल

कॅप्टन, बोइंग-७७७ एअर इंंडियानं घेतलेल्या या निर्णयामुळं भारताच्या नावे एक वेगळा रिकॉर्ड नोंदवला जाणार आहे. तसेच यामुळे अनेक महिला वैमानिकांचा आत्मविश्वास देखील उंचावणार आहे.

Updated : 9 Jan 2021 8:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top