Home > News > रेखा जरे यांची हत्या प्रेमप्रकरणातून, पोलीसांचा खुलासा, बाळ बोठेच्या अडचणीत वाढ

रेखा जरे यांची हत्या प्रेमप्रकरणातून, पोलीसांचा खुलासा, बाळ बोठेच्या अडचणीत वाढ

रेखा जरे यांची हत्या प्रेमप्रकरणातून, पोलीसांचा खुलासा, बाळ बोठेच्या अडचणीत वाढ
X

राज्यात चर्चेचा विषय बनलेल्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्यआरोपी असलेल्या बाळ बोठे विरोधात पारनेर पोलिसांनी पुरवणी दोषाआरोपत्र दाखलं केलं आहे. पत्रकार असलेल्या बाळ बोठेचे रेखा जरे यांच्यासोबत प्रेमसमंध होते. यातून त्यांच्यात वाद झाले. पुढे बदनामीच्या भितीने बोठेने जरे यांचा खुन केल्याचं पोलिसांनी या आरोप पत्रात म्हटलं आहे.

३० नाहेंबर २०२० रोजी अहमदनगर-पुणे मार्गावर तालुक्यातील जातेगाव घाटात रेखा जरे यांची गळा चिरून, निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी जरे यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. जरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोघांपैकी एकाचे छायाचित्र जरे यांच्या मुलाने काढले होते. याच छायाचित्रावरून पोलिसांनी दोन आरोपींना हत्येचा दुसऱ्या दिवशी अटक केली. यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी तिघांना अटक करण्यात आली. त्यांची कसून चौकशी करण्यात आली असता बाळ बोठे हा रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती पुढे आली.

बोठेला अटक केल्यानंतर अन्य आरोपींविरुद्ध हे ४५० पानांचे पुरवणी दोषारोपत्र आज (मंगळवार) पारनेर न्यायालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली.

Updated : 9 Jun 2021 6:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top