Home > News > डॉ. विशाखा शिंदे यांच्यावर घाईघाईने केलेली कारवाई - डॉ. सचिन वहाडणे

डॉ. विशाखा शिंदे यांच्यावर घाईघाईने केलेली कारवाई - डॉ. सचिन वहाडणे

डॉ. विशाखा शिंदे यांच्यावर घाईघाईने केलेली कारवाई - डॉ. सचिन वहाडणे
X

अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात 6 नोव्हेंबर रोजी घडलेल्या आगीच्या दुर्घटनेत 11 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर 6 रुग्ण गंभीर जखमी झाले होते, या जखमी रुग्णांना अहमदनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यातील आणखी एका रुग्णांचा आज दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लक्ष्मण आश्रजी सावळकर ( वय 60) असे मृत रुग्णांचे नाव असून, ते शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील रहिवासी आहे. आज सकाळी त्यांचा शहरातील साईदीप या खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील अग्नी तांडवातील मृतांचा आकडा वाढून तो 12 वर पोहचला आहे.

दरम्यान , या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार धरत 6 जणांवर कारवाई करण्यात आली त्यातील 4 जणांवर पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली. दरम्यान अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिशय घाई घाईने कारवाई करण्यात आल्याचे म्हणत या प्रकरणी खऱ्या गुन्हेगारांना पोलीस तसेच प्रशासनाकडून अभय दिले जात असून ज्यांचा दोष नाही अशांवर कारवाई होत असल्याचा आरोप अहमदनगर इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. सचिन वहाडणे यांनी 'मॅक्स महाराष्ट्र' शी बोलताना म्हटले आहे.

या दुर्घटनेस जबाबदार धरत अटकेची कारवाई झालेल्या डॉ. विशाखा शिंदे या शिकाऊ डॉक्टर होत्या, त्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कायम स्वरूपी कर्मचारी नव्हत्या त्यामुळे यांच्यावर करण्यात आलेली कारवाई अतिशय चुकीची आहे. आपली चूक लक्षात आल्यानंतरच प्रशासनाने त्यांच्यावरील निलंबणाची कारवाई मागे घेण्यात आली. मात्र, त्यांच्यावर 304 आणि 304 ए कलमाखाली दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामुळे त्या तुरुंगात आहेत. ही पोलिसांकडून करण्यात आलेली कारवाई चुकीची आहे. असं डॉ. वहाडणे यांनी म्हटले आहे.

Updated : 17 Nov 2021 12:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top