Home > News > अहाना गौतमने केला ३० व्या वर्षी १०० कोटींचा व्यवसाय

अहाना गौतमने केला ३० व्या वर्षी १०० कोटींचा व्यवसाय

अहाना गौतमने केला ३० व्या वर्षी १०० कोटींचा व्यवसाय
X

अनेक तरुणांसाठी, आयआयटीमध्ये प्रवेश मिळवणं आणि त्यातून शिक्षण घेणं हे एक स्वप्न असतं. आणि आयआयटी मधून पदवी घेतल्यानंतर लाखोंच्या पॅकेजसह नोकरी मिळवणं हे तर अपेक्षितच असतं. पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या अपेक्षांपेक्षा वेगळ्या घडतात. अशाच एका तरुणीची प्रेरणादायी गोष्ट आपण आज पाहूया.

अहाना गौतम, एक अशी तरुणी जिने वयाच्या ३० व्या वर्षी अमेरिकेतील लाखोंची नोकरी सोडून भारतात परत येण्याचा निर्णय घेतला आणि "ओपन सिक्रेट" नावाचा एक स्नॅकिंग स्टार्टअप सुरू केला.

अहाना गौतमने आयआयटी बॉम्बेमधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि त्यानंतर हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए केले. त्यानंतर तीने प्रॉक्टर अँड गॅम्बल (P&G) आणि जनरल मिल्स सारख्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये कामही केले.

अमेरिकेत चांगल्या नोकरीमध्ये असतानाही, अहानाची नेहमीच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती. २०१९ मध्ये, तीने आपल्या आईच्या मदतीने "ओपन सिक्रेट" नावाची कंपनी सुरू केली.

अहानाला असे स्नॅक्स बनवायचे होते जे चविष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही चांगले असतील. त्यामुळे अहानाने "ओपन सिक्रेट" कंपनीतून अशा स्नॅक्सची निर्मिती सुरू केली ज्यामध्ये कोणतेही कृत्रिम रंग, स्वाद, किंवा संरक्षक नव्हते. अहाना या 30 वर्षाच्या मुलीने व्यवसायाची सुरुवात तर केलीच पण त्या व्यवसायाला यशस्वी व्यवसायात सामील करून दाखवलं

अहानाच्या कल्पनेला यश मिळालं असून अहानाची "ओपन सिक्रेट" कंपनी ही भारतातील एक लोकप्रिय स्नॅकिंग कंपनी बनली आहे. कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

अहाना गौतमची ही कथा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी दाखवून दिलं आहे की चांगल्या शिक्षण आणि अनुभवाचा वापर करून आपण स्वतःचा यशस्वी व्यवसाय सुरू करू शकतो.

Updated : 5 May 2024 11:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top