Home > News > 'करोना ना स्त्री ना पुरुष अशा मनोवृत्तीच्या माणसांना होणारा रोग' - संभाजी भिडे यांचे वादग्रस्त विधान

'करोना ना स्त्री ना पुरुष अशा मनोवृत्तीच्या माणसांना होणारा रोग' - संभाजी भिडे यांचे वादग्रस्त विधान

करोना  ना स्त्री ना पुरुष अशा मनोवृत्तीच्या माणसांना होणारा रोग - संभाजी भिडे यांचे वादग्रस्त विधान
X

'कोरोना चीनने आपल्याला पालथे पाडण्यासाठी केलेली बदमाशी असून कोरोना काल्पनिक आहे. तो ना स्त्रि ना पुरुष अशा मनोवृत्तीच्या माणसांना होणारा रोग आहे. हे सर्व थोतांड आहे असे वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी केले आहे. सांगली या ठिकाणी दसऱ्यानिमित्त दुर्गामाता दौडचे आयोजन केले जाते. या वर्षी देखील दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोपा प्रसंगी त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.

यावेळी पुढे बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर देखील टीका केली आहे. राज्यसरकरच्या सुद्धा आकाला विकारवर्त झाल्या असून दुर्गामाता दौड वर बंदी घातली पण हे बेशरम राज्यकर्यांनी दारूची दुकाने उघडली त्यांना परवानगी दिली. काय चावटपणा चालवला आहे. हा सर्व नालायक पणा चालला असून लोकांनी बंड करून उठले पाहिजे. असे शासन फेकून दिले पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.

Updated : 15 Oct 2021 8:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top