Home > News > खून करण्यासाठी त्याने Web Series पाहिल्या; प्राध्यापकाचा घरातील सदस्याने केला खून

खून करण्यासाठी त्याने Web Series पाहिल्या; प्राध्यापकाचा घरातील सदस्याने केला खून

खून करण्यासाठी त्याने Web Series पाहिल्या; प्राध्यापकाचा घरातील सदस्याने केला खून
X

गेल्या आठवड्याभरापासून चर्चेत असलेल्या औरंगाबादचचे प्राध्यापक राजन शिंदे यांच्या हत्येप्रकरणाचा पोलिसांनी अखेर उलगडा केला आहे. धक्कादायक म्हणजे शिंदे कुटुंबातील अल्पवयीन सदस्यानेच ही हत्या केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

शिंदे यांची 11 ऑक्टोबरला त्यांच्या राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आली होती. शैक्षणिक क्षेत्रातील एक नामवंत नाव म्हणून शिंदे यांच्याकडे पहिले जायचे, त्यात एका उच्चभ्रू वस्तीत झालेल्या खुनाची घटना असल्याने पोलिसांवर एक मोठा दबाव होता. मात्र अखेर पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेऊन, हत्येप्रकरणाचा उलगडा केला आहे सोबतच राजन शिंदे यांच्या हत्येसाठी वापरलेले डंबेल्स, रक्ताने माखलेला टॉवेल आणि चाकू घराजवळच्या विहिरीतून पोलिसांनी जप्त केला आहे.

Web Series पाहून केला खून.....

प्राध्यापक शिंदे आणि अल्पवयीन सदस्य यांच्यात वैचारिक मतभेद होते, करियर आणि शिक्षण याबाबत दोघांमध्ये खटके उडत होते, नातवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक यामुळेही राग होता. घटने आधी रात्री दोघांमध्ये जोरात भांडण झाले, त्यांतून शिंदे अल्पवयीन सदस्याला रागावले आणि तो राग मनात धरून खून झाला. खून करण्यासाठी त्याने Web Series पाहिल्या. त्यातून त्याने खून करण्याचं ठरवलं. यासाठी तो अनेक दिवस प्लानही करत होता.

Updated : 19 Oct 2021 2:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top