Home > News > नाना पटोले यांच्या विरोधात महिलेने खरंच तक्रार केली आहे का?

नाना पटोले यांच्या विरोधात महिलेने खरंच तक्रार केली आहे का?

नाना पटोले यांच्या विरोधात महिलेने खरंच तक्रार केली आहे का?
X

समाजमाध्यमांवर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत असणारी व्यक्ती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले असल्याचं म्हंटल जात आहे. या व्हिडीओ मध्ये एका हॉटेलमध्ये एका व्यक्ती सोबत एक महिला दिसत आहेत ती महिला त्या व्यक्तीच्या खांद्यावर डोके ठेऊन बसली आहे असा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्र वाघ यांनी ट्विटर वर शेअर करत ''काय नाना… तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटीलीतं'' असा प्रश्न केला आहे. या सगळ्या प्रकारानंतर हा व्हिडीओ एडिट केला असून हे भाजपचे कारस्थान असल्याचं नाना पाटोले यांनी म्हंटल आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता या संबंधित महिलेने महिला आयोगाकडे तक्रार केली असल्याची सोशलमिडीयावर चर्चा आहे. खरंच नाना पाटोले यांच्या विरोधात कोणत्या महिनेने महिला आयोगाला तक्रार केली आहे का? याबाबत राज्य महिला अआयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर काय म्हणाल्या आहेत पाहुयात..

मागच्या काही काळापासून अनेक राजकीय लोकांवर महिला अत्याचार केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपचे सोलापूर जिल्हा माजी अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर एका महिले व्हिडिओ प्रसारित करत फसवणूक केली असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर काही दिवस उलटतात न उलटतात तोपर्यंत भाजपचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर देखील एका महिलेने अशा प्रकारचे आरोप केले आहेत. यापूर्वीच्या सरकारमधील धनंजय मुंडे, मेहबूब शेख, संजय राठोड यांच्यावर देखील असे आरोप करण्यात आले आहेत. आता हे सगळं होत असताना ४ दिवसांपूर्वी आणखीन एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. हा व्हिडिओ भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्र वाघ यांनी देखील ट्विट केला. हा व्हिडिओ काँग्रेसचे नेते नाना पाटोळे यांचा असल्याचं त्यांनी म्हंटल. त्यानंतर एखाद्याच्या खाजगी आयुष्यात काय चालू आहे याचा अशा प्रकारे व्हिडिओ समाजमाध्यमांवर शेअर करणे कितपत योग्य असं म्हणत नेटकरी वाघ यांच्यावर चांगलेच संतापले. नाना पटोले यांनी देखील हा व्हिडीओ एडिट केला असून हे भाजपचे कारस्थान असल्याचं म्हंटल आहे.

त्यानंतर समाजमाध्यमांवर अशी चर्चा सुरु झाली की, संबंधित महिलेने नाना पाटोले यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. पण यामध्ये कोणतीही सत्यता नाही. कोणत्याही महिलेने याबाबत आयोगाकडे तक्रार केली नसल्याचा खुलासा आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्वतः केला आहे. त्यांनी म्हंटले आहे की, राज्य महिला आयोगाकडे संबंधित पीडित महिला ज्यावेळी तक्रार करतात त्याची आम्ही दखल घेत असतो. याबाबत कोणतीही तक्रार महिला आयोगाकडे आलेली नाही. एखाद्या पीडित महिलेची अशी तक्रार जेव्हा आयोगाकडे येते त्यावेळी त्या तक्रारीची शहानिशा करून पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना आम्ही देत असतो. राज्य महिला आयोग हे एक घटनात्मक पद आहे. कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता आयोगाकडे जी तक्रार व पुरावे मिळालेले असतात त्यानुसार आम्ही पोलिसांना सूचना देत असतो. असं चाकणकर यांनी म्हंटल आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर नाना पटोले यांच्या विरोधात संबंधित महिलेने तक्रार केली असल्याची जी चर्चा आहे त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही..

Updated : 22 July 2022 4:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top