Home > News > शिवभक्तांच्या नाराजीनंतर प्रार्थना बेहेरेंची माफी!

शिवभक्तांच्या नाराजीनंतर प्रार्थना बेहेरेंची माफी!

शिवभक्तांच्या नाराजीनंतर प्रार्थना बेहेरेंची माफी!
X

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लातूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. यामुळे शिवभक्त संतप्त झाले आणि त्यांनी प्रार्थनाचा निषेध करत तिच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनर्स फाडले. या वादानंतर प्रार्थनाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत माफी मागितली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त. लातूरमधील एका मॉलच्या उद्घाटन सोहळ्याला प्रार्थना बेहेरे उपस्थित होती. यावेळी तिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला. शिवभक्तांना हे आवडले नाही आणि त्यांनी प्रार्थनाचा तीव्र निषेध केला.

वाद वाढल्यानंतर प्रार्थनाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत माफी मागितली आहे. व्हिडीओमध्ये ती म्हणते, "नमस्कार मी प्रार्थना बेहेरे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आज मी उदगीरमध्ये मॉलच्या उद्घाटनासाठी आले होते. तिथे मी चुकून काही बोलले असेल तर मी सर्वांची माफी मागते. मला माझी चूक कळली आहे आणि मी पुन्हा अशी चूक करणार नाही."

प्रार्थनाने माफी मागितलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही जण प्रार्थनाला माफी देत आहेत, तर काही जण तिच्यावर टीका करत आहेत.

प्रार्थना बेहेरे 'जय महाराष्ट्र ढाबा', 'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही' या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तसेच 'पवित्र रिश्ता', 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकांमध्ये देखील तिने काम केले आहे.

Updated : 20 Feb 2024 4:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top