Home > News > ''अरे कोंबडी चोर ..'' नितेश राणेंच्या त्या पोस्टनंतर नेटकरी भडकले

''अरे कोंबडी चोर ..'' नितेश राणेंच्या त्या पोस्टनंतर नेटकरी भडकले

अरे कोंबडी चोर .. नितेश राणेंच्या त्या पोस्टनंतर नेटकरी भडकले
X

भाजपचे आमदार नितेश राणे आषाढी एकादशीनिमित्त राहुल गांधी यांनी कुठल्याही प्रकारची पोस्ट ट्विटरवर न केल्यामुळे चांगले संतापल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी ट्विट करत राहुल गांधी यांना पप्पू म्हणत तुमची एकदा सत्ता गेली की तुमचा त्या राज्यातील रसही संपतो. हाच तो फंडा आहे ना? असं म्हणत टीका केली. पण खरंच राहुल गांधी यांनी आज आषाढी एकादशीनिमित्त समाजमाध्यमांवर शुभेच्छा दिल्या नाहीत का? तर आपण जर पाहिलं तर फेसबुकच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्याही मराठी मधून. पण नितेश राणे यांनी कुठलीही खातरजमा न करता थेट राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी फेसबुकच्या माध्यमातून सकाळीच आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत त्यांनी मराठीमध्ये शुभेच्छा देत म्हटला आहे की, होय होय वारकरी l पाहे पाहे रे पंढरी ll अठरापगड जातीत विभागलेला बहुजन समाज संतानी 'विठ्ठल'नावाच्या एका ध्वजाखाली एकत्र आणला. लोकमानसाचे संस्करण करीत अध्यात्माचे लोकशाहीकरण केले. राष्ट्रीय एकात्मतेच्या पुढे जाऊन वैश्विक एकात्मतेची संकल्पना मांडली. जगाच्या औत्सुक्याचा आणि कौतुकाचा विषय असलेली पंढरीची वारी आणि पांडुरंग हे वैश्विक एकात्मतेचे प्रतीक आहे. 'मी' पणा विसरुन 'आम्ही' अशी व्यापक भावना जनसमुदायात निर्माण करून 'पांडुरंग' या ध्येयाप्रती घेऊन जाणारी वारी आणि आषाढी एकादशी हे आपले लोकसांस्कृतीक वैभव आहे. सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
राहुल गांधी यांनी या शुभेच्छा फेसबुकच्या माध्यमातून दिल्या आहेत. मात्र त्यांनी या संदर्भातील शुभेच्छांचे ट्विट मात्र केलं नाही. पण राहुल गांधी यांनी शुभेच्छा दिल्या नाहीत असं म्हणणं पूर्णतः चुकीचा आहे. आता नितेश राणे यांच्याकडून निष्काळजीपणे कुठलीही खातरजमा न करता त्यांनी केलेल्या या ट्विटवर नेटकरी मात्र चांगलेच संतापले आहेत. तेजस जिचकर INC या ट्विटर वापरकर्त्याने नितेश राणे यांना उत्तर देत म्हटल आहे की, अरे कोंबडी चोर आधी नीट बघून तरी घे..

अमीर आतार हे ट्विटर वापरकरते नितेश राणे यांना उत्तर देत म्हंटल आहे की, आपण कोण आहोत काय करतो काय बोलतो,कोणाबद्दल बोलतो ,, थोडं तरी भान ठेवावे,, सतत दादागिरी करता म्हणजे काय हो,तुम्ही स्वतः ला काय समजता.. आपला पक्ष नेऊन बांधला आहे ना दावणीला तिथं सुखी संसार करा,,इतर गोष्टीत अजिबातच लक्ष घालू नका,, मीडियावर इतक्या गोष्टी व्हायरल करू समजायचं बंद होईल अरे तुम्हाला दिसलं नाही, म्हणजे सगळ्या जगाला दिसलं नाही असं होत नाही,, बबड्यात्याच गांधींच्या पायाशी लोळण घेत होते पिताश्री मुख्यमंत्री करा म्हणून,,विसरलात कायअशा नितेश राणे यांच्या विषयी संताप व्यक्त करणाऱ्या अनेक कमेंट त्यांच्या या ट्विट खाली आल्या आहेत.

Updated : 11 July 2022 3:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top