Home > News > साहेबांनंतर मला माझा वाढदिवस साजरा करावासा वाटत नाही... खा.प्रितम मुंडेंची भावुक पोस्ट

साहेबांनंतर मला माझा वाढदिवस साजरा करावासा वाटत नाही... खा.प्रितम मुंडेंची भावुक पोस्ट

साहेबांनंतर मला माझा वाढदिवस साजरा करावासा वाटत नाही... खा.प्रितम मुंडेंची भावुक पोस्ट
X

"साहेबांनंतर मला माझा वाढदिवस साजरा करावासा वाटत नाही यावर्षी तो करणार नाही" हे शब्द आहेत लोकसभा खासदार प्रीतम मुंडे यांचे... १७ फेब्रुवारी प्रीतम मुंडे यांचा वाढदिवस आहे आणि त्याअगोदरच प्रीतम मुंडे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून वरून एक भावुक पोस्ट टाकली आहे आणि कार्यकर्त्यांना आपल्याला भेटायला घेण्याचं आवाहन त्यांनी केला आहे.

त्यांच्या या पोस्टमध्ये, "साहेबांच्या नंतर मला माझा वाढदिवस साजरा करावासा वाटत नाही, यावर्षीही करणार नाही. कधी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कधी घरच्यांची इच्छा म्हणून केक कापला पण त्यात मन नाही विशेषतः करोनाच्या संकटा पासून आणखीणच नको वाटत, ज्या भडक साजरीकरणासाठी इतरांना नाव ठेवायची तेच स्वतः करण योग्य नाही! 17 तारखेला जिल्ह्यात तर नाहीच आहे आणि मुंबईत ही उपलब्ध होऊ शकणार नाही, त्यामुळे सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण 17 तारखेला मुंबईत येऊ नये; आपली भेट न होता तुम्हाला माघारी जाव लागल तर मला वाढदिवसाच्या दिवशी आनंद होण्याऐवजी पीडा होईल. यादिवशी अवाजवी खर्च टाळून त्यापेक्षा गरीब मुलांना खाऊ वाटा, मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करा, 15 ते 18 वर्ष वयोगटांतील युवांच्या लसीकरणाची मोहीम राबवा. आपापल्या परीने कोणत्याही वंचिताचा योग्य सन्मान करा; त्याच्या वाटणीला सुखाचे क्षण येऊ द्या हीच मला खरी भेट 🙏🏻

धन्यवाद.

(आपण सर्व या विनंतीचा सन्मान कराल ही अपेक्षा 🙏🏻🙏🏻)" असं त्या म्हणाल्या आहेत.

यासोबतच त्यांनी दिवंगत नेते आणि वडील गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत असलेला स्वतःचा बालपणीचा फोटो त्यांनी शेअर केला आहे. त्यांच्या या पोस्ट खाली कार्यकर्त्यांनी आतापासूनच वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.

Updated : 15 Feb 2022 2:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top