Latest News
Home > News > Jio चा वापरकर्त्यांना मोठा झटका; प्रीपेड प्लॅनच्या किमती 21% पर्यंत वाढ..

Jio चा वापरकर्त्यांना मोठा झटका; प्रीपेड प्लॅनच्या किमती 21% पर्यंत वाढ..

Jio चा वापरकर्त्यांना मोठा झटका; प्रीपेड प्लॅनच्या किमती 21% पर्यंत वाढ..
X

व्होडाफोन, आयडिया आणि एअरटेलनंतर जिओनेही (JIO) आपल्या यूजर्सला धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या प्रीपेड प्लॅनमध्ये 21% पर्यंत वाढ केली आहे. १ डिसेंबरपासून नवे दर लागू होतील. देशातील सर्वात मोठी मोबाइल ऑपरेटर जिओने रविवारी प्रीपेड दरात वाढ करण्याची घोषणा केली. या अंतर्गत, JioPhone प्लॅन, अनलिमिटेड प्लॅन आणि डेटा अॅड-ऑन 19.6 वरून 21.3% पर्यंत वाढवले ​​आहेत. Airtel आणि Vodafone Idea ने गेल्या आठवड्यातच त्यांच्या योजना 25% ने महाग केल्या आहेत. या कंपन्यांनी सतत वाढत जाणारा तोटा हे त्यामागचे कारण सांगितले होते.

75 रुपयांचा प्लॅन आता 16 रुपये महाग मिळणार

Jio ने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, विद्यमान 75 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत 1 डिसेंबरपासून 20% ने वाढून 91 रुपये होईल. 129 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत 155 रुपये, 399 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत 479 रुपये, 1,299 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत 1,559 रुपये आणि 2,399 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत आता 2,879 रुपये असेल. डेटा टॉप-अपच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. आता 6 GB डेटासाठी 51 ऐवजी 61, 12 GB डेटासाठी 101 ऐवजी 121 रुपये आणि 50 GB डेटासाठी 251 ऐवजी 301 रुपये मोजावे लागतील.

Updated : 2021-11-29T15:47:03+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top