Home > News > महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजी?

महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजी?

महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजी?
X

गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसने विद्या चव्हाणांच्या नावाची घोषणा नव्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून केली. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा खासदार फौजिया खान यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. त्यांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चा सुरू होत्या. याला कारणही तसंच होतं म्हणा... राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडल्यानंतर रिक्त पदावर ऍड. हेमा पिंपळे यांच्या नावाची चर्चा रंगू लागली होती. विद्या चव्हाणांना हे पद मिळाल्यामुळे हेमा पिंपळे नाराज असल्याची कुजबूज राजकीय स्तरावर सुरू झाली होती. या सगळ्या शंकांचं निरसन करण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम पाटील यांनी हेमा पिंपळे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी मी हाडाची कार्यकर्ती असून कोणतीही अपेक्षा ठेउन काम करत नाही आणि असं काहीही नसल्याचं सांगितलं आहे.

Updated : 7 May 2022 10:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top