- एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री..
- कॉन्डोम कंपनीच्या आलीया व रणबीरला अनोख्या शुभेच्छा..
- म्हणून एकाच कुटुंबातील 9 जणांनी केली हत्या, अखेर गूढ उलगडलं..
- #MaharashtraPoliticalCrisis ; एकनाथ शिंदे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात काय घडतंय?
- "मॅडम मी खूप टेन्शन मध्ये आहे, आमचा आमदार गुवाहाटीला आहे.." Audio Clip Viral
- आता या सहा मुली ही जाणार गुवाहाटीला..
- आदित्य ठाकरेंची थेट धमकी, आत एकनाथ शिंदेंचे काय होणार?
- Teesta Setalvad ; गुजरात दंगलीप्रकरणी तीस्ता सेटलवाड यांना गुजरात ATS घेतले ताब्यात..
- बंडखोर शिंदे गटाचे नाव ठरले 'शिवसेना...'
- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या आरोग्यवारी अभियानाची सुरुवात

"रूपया काही दिवसांनी उत्खननातच सापडेल की काय अशी भीती वाटतेय" - ॲड. यशोमती ठाकूर
X
देशातील वाढत्या महागाई (Inflation) वर आणि सतत घसरत चाललेल्या रुपयावर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर प्रतिक्रिया व्यक्त करीत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी "मोदी, कुठे नेऊन ठेवलाय 'रुपया माझा' ? आता सामान्य माणुस विचारतोय!" "रूपया इतका खाली घसरत चाललाय, तो काही दिवसांनी उत्खननातच सापडेल की काय अशी भीती वाटतेय" अशा आशयाचे सूचक ट्विट करीत सर्वसामान्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
देशात पेट्रोल डिझेलसह अगदी जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी भाववाढ झाली आहे. त्यातच रुपयाचे अवमूल्यन म्हणजे सामान्य माणसाचे कंबरडे मोडण्यासारखे आहे. आधीच लॉकडाउननंतर सामान्य माणसाचे जगणे असह्य झाले असताना, आता केंद्रातील सरकारने महागाईचा आणखी एक धक्का दिला आहे. सामान्य माणसाने जगायचे तरी कसे असा उपरोधिक प्रश्न ठाकूर यांनी विचारला आहे.
रूपया इतका खाली घसरत चाललाय,
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) May 19, 2022
तो काही दिवसांनी उत्खननातच सापडेल की काय अशी भीती वाटतेय!
आता सामान्य माणुस विचारतोय!
मोदीजी, कुठे नेऊन ठेवलाय 'रुपया माझा' ?#Rupee #rupeedlumps pic.twitter.com/CxVj1IXmQ3