Home > News > बंजारा समाजासोबत मंत्री ॲड. ठाकूर यांनी साजरे केले धुलिवंदन

बंजारा समाजासोबत मंत्री ॲड. ठाकूर यांनी साजरे केले धुलिवंदन

पारंपरिक लोकगीतावर ताल धरत मंत्री ॲड. ठाकूर यांनी नृत्य केले, तसेच आपुलकीचा संवाद साधत सर्वांना दिल्या शुभेच्छा

बंजारा समाजासोबत मंत्री ॲड. ठाकूर यांनी साजरे केले धुलिवंदन
X

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज धुलिवंदनाच्या दिवशी सर्वांना मंगलमय शुभेच्छा देत, बंजारा समाजाच्या बंधु-भगिनींसोबत होळी सणाचा आनंद लुटला.
त्यावेळी बंजारा भगिनींसह पारंपरिक लोकगीतावर ताल धरत सामूहिक नृत्य केले. बंजारा बंधु-भगिनी पारंपरिक वाद्ये घेऊन आपल्या वेशभुषेसह यावेळी सहभागी झाल्या होत्या.तसेच यावेळी निवासस्थानी जमलेल्या सर्व बंजारा समाजातील बंधु-भगिनींसोबत आपुलकीचा संवाद साधत ॲड. ठाकूर यांनी सर्वांना मिठाई वाटप केले.

Updated : 18 March 2022 11:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top