Home > News > "राज ठाकरे भाजपचे हनुमान, ठरलेली पूर्ण रक्कम मिळणार नाही यासाठी.." राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा टोला

"राज ठाकरे भाजपचे हनुमान, ठरलेली पूर्ण रक्कम मिळणार नाही यासाठी.." राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा टोला

"सभेत जर शरद पवारांवर टीका केली नाही तर आपल्याला पूर्ण रक्कम मिळणार नाही, याच भीतीपोटी राज ठाकरे वारंवार शरद पवारांवर टीका करतात." राज ठाकरेंनी Adv. हेमा पिंपळे यांचे उत्तर..

राज ठाकरे भाजपचे हनुमान, ठरलेली पूर्ण रक्कम मिळणार नाही यासाठी.. राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा टोला
X

राज ठाकरे यांचे औरंगाबाद येथील बहुचर्चित भाषण पार पडले. यावेळी राज ठाकरे यांनी अत्यंत प्रक्षोभक भाषण केले आहे. त्यामुळे राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये शरद पवार यांच्यावर देखील टीका केली त्यांनी ब्राह्मण विरोधी राजकारण केलं असा आरोप केला. यावेळी राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे, लोकमान्य टिळक, रामदास स्वामी यांचा देखील उल्लेख केला. राज ठाकरे यांनी या सभेत पुन्हा शरद पवार यांना लक्ष केल्यानंतर राष्ट्रवादीने सुद्धा राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केला आहे. "राज ठाकरे यांना ठराव रक्कम मिळण्यासाठी अशा उड्या माराव्या लागतात" असा टोला राष्ट्रवादीच्या महिला नेत्या Adv. हेमा पिंपळे यांनी लागवला आहे.

राज ठाकरे यांनी पुन्हा दुसऱ्यांदा त्यांच्या सभेत शरद पवार यांच्यावरती टीका केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या Adv. हेमा पिंपळे यांनी सुद्धा राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे त्यांनी म्हटले आहे की, "दोन ड्रामेबाज सभेनंतर भाजपची सुपारी घेणारे हनुमान राज ठाकरे यांनी सभेत उड्या मारल्या, ठाकरे यांनी सभेपूर्वी भारतीय जनता पार्टीकडून इसार घेतला आहे. सभेत जर शरद पवारांवर टीका केली नाही तर आपल्याला पूर्ण रक्कम मिळणार नाही, याच भीतीपोटी राज ठाकरे वारंवार शरद पवारांवर टीका करतात. त्यांचे हे आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

Updated : 2 May 2022 3:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top