Home > News > बंडखोर आमदारांची आदित्य ठाकरेंनी काढली लाज...

बंडखोर आमदारांची आदित्य ठाकरेंनी काढली लाज...

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर आदित्य ठाकरे चांगलेच एक्टीव झाले आहेत. त्यातच आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेला सुरूवात केली आहे. त्यात बोलताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांची लाज काढली.

बंडखोर आमदारांची आदित्य ठाकरेंनी काढली लाज...
X

आदित्य ठाकरे यांनी बोरिवली येथील शाखा क्रमांक १२ ला आज भेट दिली. यावेळी त्यांनी मी दिसलो पाहिजे, नाहीतर तुम्हाला वाटेल की मी गुवाहाटील गेलो, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया दिली. पुढे बोलताना त्यांनी, ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, प्रेम आणि हवं ते सगळं दिलं त्यांनी आपल्याला विश्वासघात केला, पाठीत खंजीर खुपसला, अशी खंत देखील व्यक्त केली.

थोडी लाज ठेवा, राजीनामे द्या, निवडणूकीला सामोरे जा

सत्तेतून पळून जाणं, हे पहिल्यांदाच दिसलं. स्वतः ला विकलं की कोणती फाईल होती माहीत नाही. मुळात फुटीरतावादी आणि गद्दारांवर मला बोलायचंच नाही आहे. तिथे गेलात तिथे सुखी रहा, असं आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी बोलताना थोडी लाज ठेवा, राजीनामे द्या, निवडणुकीला सामोरे जा असं खुलं आव्हान देखील बंडखोर आमदारांना दिलं आहे. तसंच ज्यांना पळवल गेलं आहे. ज्यांना फसवून नेलं आहे, त्यांच्यासाठी मातोश्रीची दार खुली आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

ज्यांनी बंड केलं ते कधीही टिकले नाहीत - आदित्य ठाकरे

मी १५ वर्षांपूर्वी बंड बघितलं. ते कुठे आहेत ते तुम्हाला माहित असेल मलातरी माहीती नाही. शिवसेनेचा इतिहास आहे. ज्यांनी ज्यांनी बंड केलं ते कधीही टिकले नाहीत, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना इशारा दिला.

फुटीरतावादी, गद्दार कसे असतात? असं सांगताना म्हणाले की, इथून सुरत, गुवाहाटी, झाडी, गोवा आणि मग सकाळी ६ वाजता सगळं ओक्के. बंड चुकीच्या गोष्टींच्या विरोधात होतं. इथे कारण नसताना, काही तरी कारणं दिली जात आहेत. स्वतःची राक्षसी महत्वकांक्षा बघून हे गद्दारी केली. उध्दव ठाकरे जेव्हा सर्जरीमध्ये होते तेव्हा तुम्ही सोडून गेलात. तेव्हा तुम्ही आमदारांची जमवा जमाव केली, अशी भावनिक प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.

आमदारांच्या डान्सवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, डान्सचा व्हिडीओ बघून मला किळस आला. आसाममध्ये पूर आलेला असताना हे मज्जा करत होते. राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसत, ते त्यांनी दाखवून दिलं. राजकारण कमी केलं, हीच आमची चूक, असं आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी उद्या सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवर बोलताना आमचा न्यापालिकेवर विश्वास असल्याचं म्हटलं.

Updated : 10 July 2022 2:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top