Home > News > आदिती तटकरे ग्राउंड झिरोवर

आदिती तटकरे ग्राउंड झिरोवर

आदिती तटकरे ग्राउंड झिरोवर
X

राज्यातील अनेक भागात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने कोकणातील जनजीवन कोलमडून गेलं. रायगड जिल्ह्यातील अनेक भागात बिकट परिस्थितीत निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे ग्राउंड झिरोवर जाऊन लोकांच्या मदतीला धावून आल्याच्या पाहायला मिळत आहे. गेली दोन दिवस त्या सतत नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेत आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात दरड कोसळल्याने परिसरातील आंबेमाची या गावाशी संपर्क तुटला होता, .याठिकाणी रहिवासी मोठ्या संख्येने अडकल्याची शक्यता असल्याने SDRF टिम पाचारण करण्यात आले आहे. तेथील नागरीकांसाठी मदत कार्य सुरू असून त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत असून, अदिती तटकरे यांनी स्वता: घटनास्थळी जाऊन आढावा घेतला.

त्याचप्रमाणे पोलादपूर तालुक्यातील मौजे केवनाळे येथे मुसळधार पावसामुळे चार घरांवर दरड कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे, याठिकाणी सुद्धा अदिती तटकरे यांनी भेट देत पाहणी केली. तसेच येथील नागरीकांना स्थलांतरीत करण्याबाबत आणि जखमींना माणगाव आणि अलिबाग येथील रुग्णालयात दाखल करण्याबाबत सुद्धा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
तसेच कर्जत तालुक्यात शहरासह लगतच्या परिसरात असलेल्या नाना मास्तर नगर,दहिवली-इंदिरा नगर, बामचा मळा येथे पावसामुळे शुक्रवारी रात्री पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात भरले होते. त्यामुळे या भागात पुराच्या पाणीमुळे खुप नुकसान झाले आहे. मोईली आणि चोचीवाडा येथे पूल वाहून गेल्याने तेथील वाहतुक बंद करण्यात आला होता, या सर्व परिस्थितीचा पालकमंत्री अदिती तटकरे रात्री स्वता: घटनास्थळी जाऊन आढावा घेतला.

Updated : 24 July 2021 12:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top