वर्षाअखेर लहान मुलांची लस येणार? लहान मुलांच्या लसीकरणा संदर्भात अदर पूनावाला यांची घोषणा
सिरम कोव्हॅक्स लसीच्या चाचण्या अगदी सुरळीत सुरू असून जर सर्व चाचण्या आणि प्रक्रिया व्यवस्थित पार पडली तर पुढील वर्षीच्या सुरुवातीला लहान मुलांसाठी लस येईल असे अदर पुनवला यांनी म्हंटल आहे.
Max Women | 19 Sep 2021 5:26 AM GMT
X
X
देशात लसीकरण मोठ्या प्रमाणावर चालू आहे. लसीकरणाची मोहिम राबवली जात आहे. लवकरात लवकर दोनही डोस सर्वांना मिळावे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. पण अजूनही 18 वर्षाखालील वयोगटातील मुला-मुलींना लसीची प्रतीक्षा आहे. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी काल यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. यामध्ये लहान मुलांसाठी सिरम कोव्हॅक्स लसीच्या चाचण्या अगदी सुरळीत सुरू असून जर सर्व चाचण्या आणि प्रक्रिया व्यवस्थित पार पडली तर पुढील वर्षीच्या सुरुवातीला लहान मुलांसाठी लस येईल अस अदर पूनावाला यांनी म्हटले आहे.
Updated : 19 Sep 2021 5:28 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire