सोनी मराठी वाहिनीवरील हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमातून घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री वनिता खरात हिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वनिताने न्यूड फोटोशूट करुन हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिने आपल्या वजनाचा कोणताही न्यूनगंड नसून आपल्याला शरिराचा अभिमान आहे, असे म्हटले आहे. महिलांना त्यांच्या वजनावरुन आणि जाडेपणावरुन नेहमी टोमणे मारले जातात तसेच सिनेमा किंवा मालिकांमध्येही संधी दिली जात नाही. हाच विषय वनिताने या फोटोशूटमधून मांडला आहे. वनिता खरातची कबीर सिंग सिनेमामधील भूमिका गाजली आहे.
Updated : 1 Jan 2021 10:02 AM GMT
Next Story