Home > News > "आठवले सरांनी नेहमीच महिलांना पाठिंबा दिला" म्हणत पायल घोष चा RPI मध्ये प्रवेश

"आठवले सरांनी नेहमीच महिलांना पाठिंबा दिला" म्हणत पायल घोष चा RPI मध्ये प्रवेश

आठवले सरांनी नेहमीच महिलांना पाठिंबा दिला म्हणत पायल घोष चा RPI मध्ये प्रवेश
X

अभिनेत्री पायल घोष हिने आज रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या उपस्थितीत पायल घोषने पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशानंतर आता पायलची 'रिपब्लिकन महिला मोर्चा'च्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा आहे.

यावेळी आपल्या मनोगतात पायल म्हणाली की, "आठवले सरांनी मला नेहमीच मदत केली आहे आणि माझ्या दुःखाच्या काळात तर ते माझ्या सोबत एखाद्या देवासारखे उभे राहिले. त्यासाठी मी सरांची आभारी आहे. त्यांनी महिलांना नेहमी पाठिंबा दिला आहे, म्हणूनच मी आरपीआय पक्षात सहभागी होण्याचे ठरवले आहे. मी पक्षाच्या माध्यमातून देशासाठी काम करणार आहे. आपण आपल्या देशासाठी काही करू शकलो तर त्यात मला आनंद आहे."असं पायल ने म्हटलं आहे.

दरम्यान, सिने निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यानंतर पायल घोष ही चर्चेत आली होती. आपल्याला न्याय मिळावा, यासाठी पायल घोषने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले होते. या मागणीला रामदास आठवले यांनी पाठिंबा दिला होता. व त्या संदर्भात त्यांनी राज्यपालांचीही भेट घेतली होती.

Updated : 26 Oct 2020 10:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top