Home > News > अभिनेत्री केतकी चितळेनी काढली बीएमसी कर्मचाऱ्याची जात

अभिनेत्री केतकी चितळेनी काढली बीएमसी कर्मचाऱ्याची जात

तिच्या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. केतकी चितळेच्या व्हिडीओनंतर आता नेटकरी तिला चांगलंच ट्रोल करत आहेत.

अभिनेत्री केतकी चितळेनी काढली बीएमसी कर्मचाऱ्याची जात
X

तिच्या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. केतकी चितळेच्या व्हिडीओनंतर आता नेटकरी तिला चांगलंच ट्रोल करत आहेत.

मराठी अभिनेत्री केतकी चितळे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. केतकी चितळे नेहमीच बोल्ड आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलनाची मोठी हवा आहे. या आंदोलनाला यश आले असून महाराष्ट्रभर मराठा आरक्षणाचा सर्वे चालू आहे. याच दरम्यान सरकारच्यावतीने सध्या जातगणना केली जात आहे. या सर्वेक्षणासाठी काही बीएमसी कर्मचारी प्रत्येक घरोघरी जाऊन काही प्रश्नोत्तर करत आहेत.

सध्या केतकी चितळेचा सोशल मिडियावर एक विडियो प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात एक महिला कर्मचारी केतकी चितळे राहत असलेल्या सोसायटीमध्ये जाते. त्यावेळी केतकी चितळे हिने या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून तिचा एक व्हिडीओ बनवला. नेहमीच वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणाऱ्या मराठी मनोरंजनसृष्टीची कॉन्ट्रव्हर्सी क्वीन केतकी चितळे पुन्हा चर्चेत आली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या महिला कर्मचारीसोबत केतकी चितळेने हुज्जत घालत वादग्रस्त वक्तव्य केले. केतकी चितळेने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, महापालिकेची महिला कर्मचारी जात असते. तिला केतकी चितळे थांबवते आणि विचारते तुम्ही महापालिकेकडून आला आहात ना? तुम्ही सर्वांना त्यांची जात विचारत आहात. आरक्षित की ओपन? यावर ही महिला कर्मचारी हो म्हणून उत्तर देते. त्यानंतर केतकी तिला का? असा देखील सवाल करते. यावर ही कर्मचारी आरक्षणासाठी सर्वेक्षण करत असल्याचे उत्तर देते. त्यावर केतकी म्हणते मराठा आरक्षणासाठी का?, नेमकं कशासाठी ? तुमची जात कोणती? अशा प्रकारचे अनेक प्रश्न या कर्मचारीला विचारते..

म्हणजे माझ्यावर अॅट्रॉसिटी टाकणार नाहीत

या व्हिडीओमध्ये केतकी पुढे म्हणते की, 'तुम्ही मराठा आहेत म्हणजे माझ्यावर अॅट्रॉसिटी टाकणार नाहीत. मी चित्पावन कोकणस्थ ब्राम्हण आहे. धन्यवाद मॅडम. आज प्रजासत्ताक दिन आहे आणि हे लोकं आरक्षणासाठी प्रश्न विचारत आहे. महापालिकेकडून ही लोकं येत आहेत. जातीबाबत प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे संविधान आणि कायदा सर्वांसाठी समान नाही. प्रजासत्ताकदिनाच्या दिवशीच हा सर्वे सुरु आहे. संविधान जाती-जातींमध्ये भेदभाव निर्माण करत आहे. जातींवर आधारित कायदे बनवले जात आहेत. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय', असं म्हणत तिने व्हिडीओ थांबवते. केतकीचे हे वागणं नेटकऱ्यांना अजिबात पटलेलं नाही. त्यामुळे ते तिला ट्रोल करू लागले आहेत.

Updated : 31 Jan 2024 7:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top