कंगना रनौत कोरोना पॉझिटिव्ह; हिमाचलला जाण्यापूर्वी केली होती टेस्ट
कंगनाने याविषयी आपल्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट लिहत ही माहिती दिली आहे.
Team | 8 May 2021 7:09 AM GMT
X
X
आपल्या विविध वक्तव्याने नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रनौतचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कंगनाने याविषयी आपल्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट लिहत ही माहिती दिली आहे.
कंगनाने ध्यानधारणा करतानाचा आपला एक फोटो शेअर करत खाली लिहलं आहे की, गेल्या काही दिवसांपासून मला थकवा जाणवत होता आणि माझे डोळ्यांना सुद्धा त्रास होत होता. हिमाचलला जाण्यापूर्वी मी कोरोना चाचणी केली होती, ज्याचा रिपोर्ट आज आला आहे.
ज्यात मी पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे मी स्वतःला क्वारंटाइन करून घेतलं आहे. मला माहित नाही की कोरोना माझ्या शरीरात कसा आला,मात्र मला हे माहीत आहे की मी कोरोनाला हरवणार, असल्याची पोस्ट कंगनाने केली आहे.
Updated : 2021-05-08T12:54:15+05:30
Tags: Kangana Ranaut corona
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire