Home > News > मुंबईत पॉर्न व्हिडिओचं चित्रिकरण, अभिनेत्री गहना वशिष्ठला क्राईम ब्रांचने केली अटक...

मुंबईत पॉर्न व्हिडिओचं चित्रिकरण, अभिनेत्री गहना वशिष्ठला क्राईम ब्रांचने केली अटक...

मुंबईत पॉर्न व्हिडिओचं चित्रिकरण, अभिनेत्री गहना वशिष्ठला क्राईम ब्रांचने केली अटक...
X

एकता कपूरच्या अल्ट बालाजी या OTT (ओव्हर द टॉप) प्लॅटफॉर्मवरील गंदी बात या वेब सिरीज मधून झळकणाऱ्या अभिनेत्री गहना वशिष्ठला मुंबई पोलीसांच्या क्राईम ब्रांचनं शनिवारी अटक केली आहे. गहना मुंबईत पॉर्न फिल्म रॅकेट चालवत असल्याची बातमी पोलीसांना मिळाली होती.

गहनाला आज मुंबई पोलीस सत्र न्यायालयात हजर करणार आहेत. पोलीस सध्या इतर कलाकार, मॉडेल आणि प्रोडक्शन हाऊसचाही तपास करत आहेत. यांच्यावर अॅडल्ट फिल्म मोबाईल अॅप आणि वेबसाईटवर अपलोड करण्याचा आरोप आहे. गहनाचं मुंबईत स्वतःच प्रोडक्शन हाऊस आहे. ज्या ठिकाणी वेबसीरिज आणि मालिकेच्या नावावर पॉर्नोग्राफी व्हिडिओ शूट केले जात होते. हे शूट केलेले व्हिडिओ काही पॉर्न साईट्स आणि मोबाईल ऍप्सवर अपलोड केले जात होते.

मिस एशिया बिकनीचा मान पटकवणाऱ्या गहना वशिष्ठनं हिंदी आणि तेलुगू सिनेमांमध्ये काम केलं आहे. वेबसाईटवर अश्लील कंटेट अपलोड करण्याबाबत शनिवारी दुपारी गहनाची चौकशी केली गेली होती. गहनाची चौकशी केल्यानंतर याप्रकरणी क्राईम ब्रांचनं आतापर्यंत गहनासह एकूण ६ लोकांना या प्रकरणी अटक केली आहे.

Updated : 7 Feb 2021 8:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top