Home > News > अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी घेतली राज्यपालांची भेट; कोशारींनी केलं कौतुक

अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी घेतली राज्यपालांची भेट; कोशारींनी केलं कौतुक

दिपाली भोसले सय्यद व महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यात तबल ४० मिनिटे विविध सामाजिक विषयांवर चर्चा

अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी घेतली राज्यपालांची भेट; कोशारींनी केलं कौतुक
X

सिने अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद व महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यात तबल ४० मिनिटे विविध सामाजिक विषयांवर चर्चा झाली. यावेळी दिपाली सय्यद यांच्या सामाजिक कार्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी कौतुक केले.रायगड सह कोकण महाराष्ट्रात अतिवृष्टीने हाहाकार माजविला.सर्वत्र कोट्यवधीची वित्तहानी व मनुष्यहानी देखील मोठ्या प्रमाणावर झाली. यावेळी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पूरग्रस्त व दरडग्रस्त भागात स्वतः जाऊन मदतीचा हात दिला होता.

दिपाली भोसले सय्यद यांच्या चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून पूरग्रस्त भागाची पाहणी करून आपण जी १० कोटी मदत केली त्या बदल आपले खरोखर मनापासून आभार असे उदगार राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केले.

त्या चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून होत असलेल्या सामाजिक कार्याची माहीती सुद्धा राज्यपाल यांनी यावेळी घेतली.

दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून सांगली येथील एक हजार मुलींच्या लग्नाची जबाबदारी दिपाली सय्यद यांनी घेतली असून, प्रत्येक मुलीच्या नावे ५०००० रू पन्नास हजार रुपये ची मुदत ठेव करण्यात आली आहे. याचे वाटप पुढील महिन्यात सांगली येथे होणार असून या कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंग कोशारी उपस्थित राहणार आहेत.

Updated : 20 Aug 2021 3:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top