Home > News > शाहरुख खानच्या मुलासोबत अभिनेत्री अनन्या पांडे KKR ला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात..

शाहरुख खानच्या मुलासोबत अभिनेत्री अनन्या पांडे KKR ला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात..

काही दिवसांपूर्वी खान कुटुंब मोठ्या वादात सापडले होते. त्यामध्ये अभिनेत्री अनन्या पांडेंची देखील चौकशी केली गेली होती. त्यानंतर आता अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान व अनन्य पांडे एकत्र IPL च्या सामान्य दरम्यान एकत्र दिसले.

शाहरुख खानच्या मुलासोबत अभिनेत्री अनन्या पांडे KKR ला  प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात..
X

काल शुक्रवारी, आयपीएल 2022 चा आठवा सामना कोलकाता आणि पंजाब यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये केकेआरने चांगली खेळी केली आणि सामना 6 विकेटने जिंकला. या मॅचमध्ये बॉलिवूड अभिनेता आणि कोलकाता टीमचा मालक शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, त्याचा मुलगा आर्यन खान आपल्या टीमला प्रोत्साहन देताना दिसले. यावेळी सुहानाची मैत्रिण आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेही उपस्थित होती. या सामन्यात कोलकाताचे दोन खेळाडू उमेश यादव आणि आंद्रे रसेल यांनी अप्रतिम खेळ केली. रसेलने 31 चेंडूत 70 धावा केल्या. कोलकाताचे सामने मुंबईत खेळले जात आहेत. यापूर्वी आर्यन आणि सुहाना यांनी कोलकाता संघाच्या वतीने आयपीएलच्य लिलावात देखील भाग घेतला आहे.
शाहरुख खान अजून IPL 2022 मध्ये दिसलेला नाही

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आतापर्यंत कोलकाता सामन्यात संघाला पाठिंबा देन्यासाठी आलेला दिसला नाही. प्रत्येक वर्षी तो आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडीयमवर आलेला दिसतो. तो त्याच्या आगामी 'पठाण' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे सांगण्यात येत आहे.
आर्यनवर ड्रग्ज घेतल्याचा आरोप

काही दिवसांपूर्वी खान कुटुंब मोठ्या वादात सापडले होते. शाहरुखचा मुलगा आर्यन खानवर ड्रग्ज सेवन आणि परदेशी ड्रग्ज पेडलर्सच्या संपर्कात असल्याचा आरोप होता. आर्यनला एनसीबीने इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनलवर कॉर्डेलिया या क्रूझ जहाजातून अटक केली. नंतर या प्रकरणात आर्यनविरुद्ध कोणताही पुरावा सापडला नाही.

Updated : 2 April 2022 4:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top