Home > News > सलमान खानच्या बहिणीच्या घरी चोरी, घरातील व्यक्तीनेच मारला डल्ला...

सलमान खानच्या बहिणीच्या घरी चोरी, घरातील व्यक्तीनेच मारला डल्ला...

सलमान खानच्या बहिणीच्या घरी चोरी, घरातील व्यक्तीनेच मारला डल्ला...
X

अभिनेता सलमान खान यांची बहीण अर्पिता शर्मा यांच्या घरात चोरी झाली. तब्बल पाच लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले. या सगळ्या संदर्भात अर्पिताने पोलिसात तक्रार केली आणि पोलिस तपासात धक्कादायक प्रकार समोर आला. त्यांच्या घरी चोरी करणारा चोर हा दुसरा तिसरा कोणी नसून त्यांच्याच घरातील एक व्यक्ती होता. त्यांच्याच घरातील व्यक्तीने नजर ठेवत पाच लाख रुपयांचे दागिने चोरी केले. नक्की ही चोरी कशी झाली? घरातील हा चोर कोण होता? हे सर्व आपण पाहून पण त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनेल वरती नवीन असाल तर आपल्या MaxWoman चे नवीन पेज तुम्ही लाईक करायला विसरू नका, त्याचबरोबर युट्युबवर देखील तुम्ही आम्हाला नक्की फॉलो करा...

सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्माच्या घरातून 5 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले. अर्पिताने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर चोर तिच्या घरातीलच असल्याचे निष्पन्न झाले. तिचे 5 लाख रुपयांचे डायमंड व कानातले चोरला गेले होते. 16 मे रोजी रात्री तिच्या घरातून चोरी झाल्याचे अर्पिताने तक्रारीत म्हटले आहे. तत्परतेने कारवाई करत पोलिसांनी त्याच रात्री चोराला पकडत त्याच्याकडून अंगठी आणि हिऱ्यांचे दागिनेही जप्त केले.

मेक-अप ट्रेमध्ये ठेवलेला दागिना चोरट्याने हळूच नेला..

चोरी गेलेला दागिना तिने मेकअप ट्रेमध्ये ठेवले होते. चोरी झाल्याची तक्रार येताच खार पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी एक पथक तयार केले. आणि या तपासात घरातीलच व्यक्तीने चोरी केल्याचं समोर आलं..

घरातील चोर कोण?

पोलिसांच्या तपासात संदीप हेगडे असे चोरी करणाऱ्या व्यक्तीचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. तो अर्पिताच्या घरी हाऊस हेल्प म्हणून काम करतो. संदीप व्यतिरिक्त अर्पिताच्या घरात इतर 11 गृहस्थ काम करतात. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला तात्काळ पकडले. त्याच्या घरातून हिऱ्यांचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध आयपीसी कलम ३८१ (चोरी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Updated : 18 May 2023 3:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top