Home > News > Jacqueline Fernandez ला ED चा झटका: मुंबई विमानतळावर रोखलं

Jacqueline Fernandez ला ED चा झटका: मुंबई विमानतळावर रोखलं

Jacqueline Fernandez ला ED चा झटका:  मुंबई विमानतळावर रोखलं
X

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला यांना रविवारी संध्याकाळी मुंबई विमानतळावर परदेशात जाण्यापासून रोखण्यात आले. एका शोमध्ये सहभागी होण्यासाठी ती दुबईला जात होती. प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिनची २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी होणार आहे. वास्तविक, या प्रकरणाचा तपास करत असलेल्या ईडीने जॅकलिनविरोधात लुकआउट सर्कुलर जारी केले आहे. मात्र, थोड्या चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले. आता त्यांना दिल्लीतील तपास यंत्रणेसमोर हजर राहावे लागेल, असे सांगण्यात आले आहे. जॅकलिनला सोमवारी दिल्ली कार्यालयात हजर राहण्यासाठी ईडी नव्याने समन्स बजावणार आहे.

सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटींच्या वसुलीत महत्त्वाचा साक्षीदार

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद असलेला गुन्हेगार सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या खटल्यात जॅकलीन महत्त्वाची साक्षीदार आहे. सुकेशने अनेक महागड्या भेटवस्तूही दिल्याचा आरोप जॅकलीनवर आहे. ईडीच्या चौकशीदरम्यान सुकेशने सांगितले की, त्याने जॅकलिनला 52 लाख रुपये किमतीचा एक घोडा आणि चार पर्शियन मांजरी भेट दिल्या होत्या. एका मांजराची किंमत 9 लाख रुपये आहे.

ईडीने यापूर्वीच जॅकलिनची केली होती चौकशी

याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने ऑगस्टमध्ये जॅकलिनची चौकशी केली होती. या प्रकरणी ईडीने सुकेश चंद्रशेखर, त्यांची पत्नी लीना मारिया पॉल आणि इतर सहा जणांविरुद्ध 7 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

जॅकलिनसह नोरा फतेहीचे नाव देखील आरोपपत्रात आहे

आरोपपत्रात जॅकलिन फर्नांडिससोबत अभिनेत्री नोरा फतेहीचा उल्लेख आहे. ईडीने नोराचीही चौकशी केली आहे. सुकेश चंद्रशेखरने नोराला कार खरेदी करून गिफ्ट केल्याचा आरोप आहे.

Updated : 6 Dec 2021 6:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top