Home > News > अनन्या पांडे यांच्या घरी NCB चा छापा...आर्यन खान प्रकरणाशी काही संबंध आहे का ?

अनन्या पांडे यांच्या घरी NCB चा छापा...आर्यन खान प्रकरणाशी काही संबंध आहे का ?

अनन्या पांडे यांच्या घरी NCB चा छापा...आर्यन खान प्रकरणाशी काही संबंध आहे का ?
X

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने आज अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे यांच्या घरी छापा टाकला आहे. चंकी पांडे यांच्या मुंबईतील वांद्रे या ठिकाणी असणाऱ्या घरावर हा छापा टाकण्यात आला आहे. एनसीबी कडून हा छाप आर्यन खान प्रकरणाशी संबंधित आहे किंवा नाही या संदर्भात अजूनही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. आर्यन खान आणि अनन्या पांडे Ananya Panday हे मित्र आहेत. मात्र हा छापा आर्यन खान यांच्या प्रकरणाशी संबंधित असू शकतो असी शक्याता वर्तवली जात आहे.

NCB ला आर्यन खान आणि एका बड्या बॉलीवूड अभिनेत्रीचे व्हाट्सअप चॅट मिळाले आहेत. या चॅट मध्ये ड्रग्ज बद्दल देखील चर्चा झाली होती. त्याच्या आधारे NCB ने न्यायालयाकडे आर्यन सह उर्वरित आरोपींच्या रिमांडची मागणी केली होती. मात्र ती अभिनेत्री कोण हे मात्र अजूनही उघड झालेले नाही.

NCB ची टीम आज शाहरुख खान यांच्या घरी देखील गेली होती.

अभिनेता शाहरुख खान यांच्या मुंबई येथून 'मन्नात' या निवासस्थानी आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ची टीम गेले होती. आज सकाळीच शाहरुख खान यांनी मुलगा आर्यन खान याची आर्थर रोड जेल मध्ये जाऊन भेट घेतली होती.

Updated : 21 Oct 2021 8:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top