अभिनेत्री रश्मिका मंदनाचा "डीप फेक" व्हिडिओ बनवणारा आरोपीला आंध्रप्रदेश मधून अटक;
prakash patil | 21 Jan 2024 10:24 AM GMT
X
X
गेल्या अनेक दिवसापासून "डीपी फेक" या तंत्रज्ञानाची चर्चा होती. आणि याच तंत्रज्ञानाचा वापर करून पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदनाचा फेक व्हिडिओ बनवण्यात आला होता. पण तो व्हिडिओ बनवणार्यला पोलिसांनी आंध्रप्रदेश मधून अटक केली आहे. याची माहिती IFSO यूनिटचे डीसीपी हेमंत तिवारी यांनी दिली. या पूर्वीच 4 जणांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आज या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली.
रश्मिका झाली होती नाराज;
जेव्हा हा व्हिडिओ व्ह्यायरल झाला होता तेव्हा रश्मिका खूप नाराज झाली होती. सोशल मीडिया च्या माध्यमातून तिने आपली नाराजी पण व्यक्त करताना म्हणाली होती की यावर उपाय शोधला पाहिजे. जेणेकरून कोणालाच याचा त्रास् होणार नाही.
अमिताभ बच्चन यांनी ही यावर नाराजी व्यक्त केली होती. कडक कारवाईची मागणी केली होती.
Updated : 21 Jan 2024 10:24 AM GMT
Tags: rashmika mandana animal pushpa dp fake
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire