Home > News > चित्रा वाघ आणि पिडीतेचे संगनमताने आरोप, रघुनाथ कुचिकच्या मुलीची महिला आयोगाकडे तक्रार

चित्रा वाघ आणि पिडीतेचे संगनमताने आरोप, रघुनाथ कुचिकच्या मुलीची महिला आयोगाकडे तक्रार

रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणात कुचिक यांच्या मुलीने महिला आयोगाकडे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार केली आहे.

चित्रा वाघ आणि पिडीतेचे संगनमताने आरोप, रघुनाथ कुचिकच्या मुलीची महिला आयोगाकडे तक्रार
X

शिवसेनेचे कामगार नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आला असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. रघुनाथ कुचिक यांच्या मुलीने भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. तर, चित्रा वाघ या पोलिसांवर खोटे आरोप करत आहे, असं म्हणत आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केला आहे.

शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणात कुचिक यांच्या मुलीने महिला आयोगाकडे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार केली आहे. चित्रा वाघ आणि पीडित मुलगी संगनमताने बदनामी करत आहे, अशी तक्रार कुचिक यांच्या मुलीने केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन रुपाली चाकणकर यांनी पुणे पोलिसांना चौकशीचे आदेश आहे.

महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचं काम काही जणांकडून केलं जात आहे, माझी विनंती आहे पोलिसांना मध्ये आणू नये. रघुनाथ कुचिक यांच्या मुलीने ही मेल केलेला आहे, या प्रकरणी चौकशी सुरू असताना चित्रा वाघ या रघुनाथ कुचिक यांच्याबाबत जे वक्तव्य करत आहे, आमच्या सामाजिक प्रतिष्ठाला धक्का पोहोचत आहे. खोटे आरोप करण्यापेक्षा सत्यता पडताळून पाहावी उगीच आरोप करू नये, येत्या 3 ते 4 दिवसात दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असं म्हणत चाकणकर यांनी वाघ यांच्यावर टीका केली

Updated : 22 March 2022 7:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top