Home > News > बापरे! सात महिन्याच्या आत पुण्यातून ८४० महिला बेपत्ता

बापरे! सात महिन्याच्या आत पुण्यातून ८४० महिला बेपत्ता

जानेवारी महिन्यापासून जूनमध्ये सर्वाधिक १८६ महिला बेपत्ता झाल्याची नोंद झाली असून त्यानंतर मे महिन्यात १३५ महिला बेपत्ता झाल्या आहेत.

बापरे! सात महिन्याच्या आत पुण्यातून ८४० महिला बेपत्ता
X



२०२२ च्या पहिल्या सात महिन्यातच पुण्यातून ८४० महिला झाल्या आहेत. त्यापैकी ३९६ महिला सापडल्या असल्याची माहिती पुणे शहर पोलिसांनी शेअर केली आहे.जानेवारी महिन्यापासून जूनमध्ये सर्वाधिक १८६ महिला बेपत्ता झाल्याची नोंद झाली असून त्यानंतर मे महिन्यात १३५ महिला बेपत्ता झाल्या आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा विचार करता ८८५ महिला बेपत्ता झाल्या आहेत, तर पुणे ग्रामीण पोलिसांनी याच कालावधीत ७४३ महिला बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे.

यातील बहुतांश महिला कौटुंबिक कलह,नातेसंबंध किंवा नोकरीच्या संधींमुळे घर सोडतात आणि अनेकजण आपली चूक लक्षात घेऊन परततात.त्याचबरोबर16 ते 25 वर्षे वयोगटातील बहुसंख्य स्त्रिया घरगुती भांडण किंवा पालकांसोबत घरातील भांडणामुळे घर सोडतात, असे पोलिसांनी सांगितले आहे.या बेपत्ता महिलांमध्ये मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या किंवा रस्त्यावर राहणाऱ्यांचाही समावेश असण्याची शक्यता आहे.सामाजिक कार्यकर्ते मात्र या हरवलेल्या केसेस मानवी तस्करीपासून वेगळे करता येणार नाहीत यावर भर देताना दिसतात.

बेपत्ता झालेल्या महिलांची ही सामूहिक संख्या असून कौटुंबिक वाद, नातेसंबंध, प्रियकराकडून लग्नाच्या बहाण्याने आमिष दाखविणे अशी अनेक कारणे असल्याचे त्यांनी सांगितले.एकाही दुव्याकडे दुर्लक्ष होत नसून प्रत्येक मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा कक्षाचे पोलिस निरीक्षक अण्णा माने यांनी दिली आहे.पोलिसांनी असेही सांगितले की अशा काही महिला आहेत ज्यांना स्वतंत्र जीवन जगायचे आहे.

महिला आणि बाल कार्यकर्त्या यामिनी अदाबे म्हणाल्या की, महिला बेपत्ता होण्यामागे अनेक कारणे असली तरी मानवी तस्करीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. प्रेमप्रकरणांमुळे किंवा कौटुंबिक वादामुळे महिला बेपत्ता झालेल्या प्रकरणांमध्ये, तरीही त्या कुटुंबातील काही सदस्य किंवा मित्राच्या संपर्कात असतात. परंतु शोध न करता येणाऱ्या महिलांची वाढती संख्या सर्वांसाठीच चिंताजनक आहे, असे अदाबे म्हणाल्या आहेत . त्याचबरोबर शिवसेना नेत्या आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी गेल्या दोन वर्षांपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत असल्याचे सांगितले आहे .याबाबत गोर्‍हे यांनी माजी गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. "बलात्काराच्या घटनांमध्ये घट झाली आहे, परंतु त्याच वेळी कौटुंबिक हिंसाचारामुळे महिला हरवण्याच्या घटनांमध्ये कालांतराने वाढ झाली आहे. मात्र, या बेपत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी पोलीस अथक परिश्रम घेत आहेत," असही गोऱ्हे यांनी म्हंटल आहे.

'मुस्कान योजने'अंतर्गत पोलिसांनी या महिलांचा शोध सुरू केला असून हरवलेल्या प्रकरणामागील सर्व बाजू शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. महिलांची सुटका केल्यानंतर पोलिसांनी त्यांचे समुपदेशनही सुरू करावे, असे त्या म्हणाल्या. ' पोलिसांनी मृत झालेल्या अनोळखी महिलांचे छायाचित्र प्रदर्शन भरवावे. जेणेकरून त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या पालकांना मिळू शकेल. त्याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक (कोल्हापूर परिक्षेत्र) मनोज लोहिया यांच्याशी चर्चा सुरू असून लोहिया त्याबाबत सकारात्मक असल्याचे सुद्धा नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं आहे

Updated : 27 July 2022 8:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top