Home > News > 'आराध्या'चा धम्माल डान्स; ऐश्वर्याची आठवण आल्या शिवाय राहणार नाही

'आराध्या'चा धम्माल डान्स; ऐश्वर्याची आठवण आल्या शिवाय राहणार नाही

आराध्याचा धम्माल डान्स; ऐश्वर्याची आठवण आल्या शिवाय राहणार नाही
X

बच्चन कुटुंब काही ना काही कारणांमुळे नेहमीच हेडलाईन्समध्ये राहतात. अमिताभ बच्चन, जया, अभिषेक, ऐश्वर्या यांच्यासह आता छोटी परी आराध्या बच्चन देखील हेडलाईन्समध्ये आहेत. कधी तिला ऐश्वर्या सोबत विमानतळावर स्पॉट केले जाते तर कधी ती विविध कार्यक्रमात कुटुंबासोबत पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा आराध्याचा एक व्हिडीओ लोकांना खूपच आवडला आहे. या व्हिडीओमध्ये छोटी परी जबरदस्त डान्स करतांना पाहायला मिळत आहे. स्टेजखाली बसलेल्या प्रेक्षकांसोबतच, व्हिडिओ पाहणारे चाहतेही आराध्याचे कौतुक करताना थकत नाहीत.

आराध्या बच्चनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर अंदाज लावला जाऊ शकतो की आराध्या तिच्या शाळेच्या फंक्शनमध्ये डान्स करताना दिसत आहे. तिने लाल गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला आहे. यासोबतच ती या कार्यक्रमात रणवीर सिंगच्या सर्वात लोकप्रिय गाणं 'अपना टाइम आएगा' वर नाचताना दिसत आहे. तर चाहते आराध्याचे जोरदार कौतुक करताना दिसत आहेत.

Updated : 9 Oct 2021 9:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top